Crime News : तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. तिनही बहिणी दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. घरातील बंद ट्रंकमध्ये (Trunk) या मुलींचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाठी काही पथकं तयार केली आहे. या मुलींचा मृत्यू (Minor Girls Found Dead) नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलं नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल.
पंजाबच्या जालंधरमध्ये (Jalandhar) ही खळबळजनक घटना घडली आहे. जालंधरमधल्या कानपूर गावात आपल्या आई-वडिलांबरोबर राहाणाऱ्या या तीन बहिणींचा एकाचवेळी मृत्यू झाला. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांना घरात कुठेच मुली दिसल्या नाहीत. त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. पण बराच वेळ झाल्यानंतरी मुली सापडल्या नाहीत. अखेर पालकांनी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली.
यातल्या सर्वात मोठ्या मुलीचं नाव अमृता असून तिचं वय 9 वर्ष होतं, तर शक्ती आणि कांचन असं इतर दोन बहिणींची नावं होती, त्या प्रत्येकी 7 आणि 4 वर्षांच्या होत्या. पालकांनी बरीच शोधाशोध केल्यानंतरही मुली मिळत नसल्याने घरात शोध घेतला. यावेळी घरातील एक ट्रंक जड वाटली, म्हणून त्यांनी ट्रंक उघडली असता तीनही मुलींचे मृतदेह आढळले. या मुली खेळता खेळता ट्रंकेत बंद झाल्या आणि गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला की त्यांची कोणी हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या बापाला दारुचं व्यसन होतं. यातूनच घर मालकाने त्यांना घर रिकामं करण्यास सांगितलं होतं. पोलीस या सर्व बाजूंनी तपास करत
भावाने भावाला संपवलं
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत भावानेच भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहनी कुटुंबात तीन भाऊ होते. या तिघांमध्ये जमिनीवरुन वाद सुरु होता. घटनेच्या दिवशी मोठा भाऊ शंकर आणि सर्वात लहान भाऊ रवी सहनी यांच्यात जमिनीवरुन पुन्हा एका वाद झाला आणि वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. यावेळी रवीने धारदार शस्त्राने मोठा भाऊ शंकरवर वार केले. यात शंकऱ जागीच कोळसला आणि त्याचा मृत्यू झाला.