Best Investment Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित उत्पन्न

जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला बेस्ट स्किम सुचवणार आहोत.( Post Office MIS)

Updated: Oct 15, 2021, 10:41 AM IST
Best Investment Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित उत्पन्न title=

नवी दिल्ली : जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला बेस्ट स्किम सुचवणार आहोत. ही स्किम पोस्ट ऑफिसची आहे. येथे गुंतवणूक केल्याने कोणत्याही प्रकारचे जोखिम नाही. ही एक मासिक उत्पन्न देणारी देखील योजना आहे. (Post Office MIS)

 प्रत्येक महिन्याला मिळणार इतके रुपये
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्किममध्ये (Post Office MIS) 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळते. या स्किमचा मॅच्युरिटी पिरिअड 5 वर्षाचा आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न सुरू होईल. जर तुम्ही एकाचवेळी 4.5 लाख रुपये जमा करीत असाल तर 5 वर्षानंतर प्रत्येक वर्षाला 29 हजार 700 रुपये मिळतील. जर तुम्हाला प्रत्येक वर्षाला उत्पन्न मिळवू इच्छिता तर तुम्हाला 2475 रुपये महिन्याची कमाई होईल. 

या लोकांसाठी चांगली योजना
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पनाची ही योजना त्या गुंतवणूकदारांसाठी चांगली योजना आहे. जे दर महिन्याला फिक्स्ड इनकम मिळवू इच्छिता. ते देखील कोणत्याही रिस्क शिवाय! त्या रक्कमेला सुरक्षित ठेवण्यासोबतच दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवता येते.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत फक्त 1000 रुपयांमध्ये खाते सुरू करता येते. 18 वर्षाहून अधिक कोणत्याही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. एक व्यक्ती एकाहून अधिक जास्त 3 अकाऊंट होल्डरसह खाते सुरू करू शकतो.

Post Office Monthly Income Scheme

असे सुरू करा खाते

  • यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिससचे बचत खाते सुरू असावे.
  • कोणताही सरकारी ओळखीचा पुरावा असावा (आधार, पॅन, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र इत्यादी)
  • 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ
  • रहिवासी पुरावा
  • मासिक इनकम स्किमसाठी अर्ज करणे. अर्ज ऑनलाईनसुद्धा डाऊनलोड करता येतो.
  • अर्जातील माहिती भरणे, सर्व गरजेचे कागदपत्र जमा करून सहजरित्या स्किमसाठी खाते सुरू होते.
  • खाते सुरू करण्यासाठी 1000 रुपयांचे रक्कम जमा करावी लागते.