एनडीएच्या घटकपक्षांचा १५ दिवसात मंत्रीमंडळात समावेश होणार?

केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज विस्तार होतो आहे. ९ नव्या मंत्र्यांसह आणखी ४ मंत्री शपथ घेणार आहेत. विद्यमान चार मंत्र्यांनी विस्तारात बढती मिळणार आहे.

Updated: Sep 3, 2017, 12:42 PM IST
एनडीएच्या घटकपक्षांचा १५ दिवसात मंत्रीमंडळात समावेश होणार? title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज विस्तार होतो आहे. ९ नव्या मंत्र्यांसह आणखी ४ मंत्री शपथ घेणार आहेत. विद्यमान चार मंत्र्यांनी विस्तारात बढती मिळणार आहे.

NDA घटकपक्षांचा समावेश १५ दिवसांनी होण्याची शक्यता आहे. पितृपक्षानंतर JDU, AIDMK आणि शिवसेनेचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे तर पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. 

राजीव प्रताप रूडी, कलराज मिश्र, संजीव बलियान, निर्मला सीतारमन, बंडारू दत्तात्रय यांसह काही युपी, बिहार आणि दक्षिणेकडील मंत्र्यानी राजीनामा दिला आहे. यावरून त्यांच्या कामगिरीवर मोदी समाधानी नसल्याचे दिसून येते. अशावेळी एकाही मराठी मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला नसल्यामुळे मराठी मंत्र्यांच्या कामगिरीवर मोदी खूष असल्याचे दिसते.