नवी दिल्ली : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अशा परिस्थितीत, हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला मिळालेलेल घर रद्द होऊ शकते. (PM Awas Yojana)
जर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेच्या घराचे वाटप झाले असेल तर, तुम्हाला पाच वर्षे राहणे बंधनकारक असेल अन्यथा तुम्हाला मिळालेले घर रद्द केले जाईल.
खरोखर तुम्ही या घरांचा वापर केला की नाही, हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. तुम्ही राहात असाल तर हा करार लीज डीडमध्ये बदलला जाईल.
अन्यथा विकास प्राधिकरण तुमच्याशी केलेला करारही रद्द करेल. यानंतर तुम्ही जमा केलेली रक्कमही परत केली जाणार नाही. म्हणजेच या योजनेतील होणारी गडबडी रोखली जाईल.
हेदेखील वाचा : PM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक
कानपूर हे असे पहिले विकास प्राधिकरण आहे. जिथे लोकांना भाडेतत्त्वावर नोंदणीकृत करारानुसार घरात राहण्याचे अधिकार दिले जात आहेत.
पहिल्या टप्प्यात केडीएचे उपाध्यक्ष अरविंद सिंग यांच्या पुढाकाराने आयोजित शिबिरात 60 जणांशी करार करण्यात आला आहे. त्याच वेळी, त्यांनी सांगितले की या आधारावर 10900 पेक्षा जास्त वाटपदारांशी करार करणे बाकी आहे.
नियम आणि अटींनुसार, शहरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले फ्लॅट कधीही फ्री होल्ड होणार नाहीत. पाच वर्षानंतरही लोकांना लीज पर राहावे लागणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जे लोक घर घेऊन जे लोक ते भाड्याने देत असत ते आता बंद होईल.
यासोबतच, जर एखाद्या वाटपाचा मृत्यू झाला तर, नियमानुसार, भाडेपट्टा कुटुंबातील सदस्यालाच हस्तांतरित केला जाईल.