नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेलची मागणी जवळपास लॉक झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. परंतु कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यानंतर आजही शहरांत पेट्रोल डिझेलचे भाव चढेच असल्याचं चित्र आहे.
असे ठरतात पेट्रोल-डिझेलचे भाव -
जगभरात परकीय चलनाच्या दरांसह, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमती ठरवतात. त्यानंतर ते दर संपूर्ण शहरात लागू होतात. परंतु 16 मार्चनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अगदी काहीशा फरकाने बदल झाले आहेत.
बुधवारी मुंबईत किंमतीत वाढ करण्यात आली. परंतु इतर शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. IOCLच्या वेबसाईटनुसार, रविवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतेही बदल झाले नाहीत.
दिल्ली - पेट्रोल 69.59 रुपये, डिझेल 62.29 रुपये
मुंबई - पेट्रोल 76.31 रुपये, डिझेल 66.21 रुपये
कोलकाता - पेट्रोल 73.30 रुपये, डिझेल 65.62 रुपये
चेन्नई - पेट्रोल 72.28 रुपये, डिझेल 65.71 रुपये
सर्व ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या IOC, BPCL आणि HPCL पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येक दिवसाला चढ-उतार होत असतात. पेट्रोल-डिझेलचे नवे दर दररोज सकाळी 6 वाजता लागू होतात. पेट्रोल-डिझेलच्या या लागू झालेल्या किंमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन या सर्व बाबी जोडल्यानंतर याच्या किंमती जवळपास दुप्पट होतात.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत एसएमएसद्वारे माहिती मिळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. जो आयओसीएलच्या वेबसाईटवरुन मिळवता येऊ शकतो.