नवी दिल्ली : येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे.
अद्याप कुणीही या निवडणूकीसाठी अर्ज दाखल केलेला नाही. पण एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कोविंद यांना एनडीएच्या सदस्य पक्षांसोबत बिहारमधून जेडीयू, उडिशातून बीजेडी, तामिळनाडूतून अण्णा द्रमुक आणि तेलंगणातून टीआरएस आणि आंध्रमधून वायएसआर काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिला आहे...
तर विरोधकांनीही निवडणूकीत माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवार म्हणून उतरवण्याचा निर्णय घेतलाय.