आई माझी इथून सुटका कर..., म्हणत विवाहितेने फोन ठेवला; नंतर आली वाईट बातमी

Married Women Died: एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 18, 2023, 07:06 PM IST
आई माझी इथून सुटका कर..., म्हणत विवाहितेने फोन ठेवला; नंतर आली वाईट बातमी title=
married woman died under suspicious

Married Women Died: एका विवाहित महिलेचा संशयित मृत्यू (Married Women Died)  झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पाच दिवसांपूर्वीच महिलेचे तिच्या आई व बहिणीशी बोलणे झाले होते. त्याचवेळी तिने तिच्या मृत्यूची भीती बोलून दाखवली होती. मात्र, आईसोबतच ते बोलण शेवटचे ठरवले. पाच दिवसांनी विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याघटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढंढार येथे राहणाऱ्या प्रियंका मेघवालचे लग्न 2015 मध्ये गोपालपुराचे रहिवाशी सुरेंद्र जाट याच्यासोबत झाले होते. तेव्हा प्रियांकाच्या कुटुंबाने या लग्नासाठी नकार दिला होता. मात्र, प्रियांका हट्टाने पेटून उठली होती. अखेर तिच्या हट्टापुढे झुकत कुटुंबीयांनी तिचे लग्न लावून दिले होते. 

लग्नानंतर काही दिवस चांगले केले मात्र काही दिवसांतच तिच्या सासरच्या मंडळींनी त्यांचे खरे रुप दाखवले. प्रियांकाची आई सुनिता मेघवाल आणि बहिण मोनिका मेघवाल यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा पती सुरेंद्र, दीर रविंद्र, सासरे धर्मेंद्र आणि सासू शंकुतला छोट्या छोट्या गोष्टीवरुन तिला मारहाण करत असे. प्रियांकाचा सासरच्या मंडळीने अमानुष छळ केला आहे. अशी तक्रार तिच्या माहेरच्यांनी दिली आहे. 

प्रियांकाची बहिणी मोनिकाने केलेल्या आरोपांनुसार, प्रियांकाच्या सासरच्या मंडळींनी अमानुषपणे तिला मारहाण केली. त्यातच तिच्या बहिणीचा मृत्यू झाला. तिच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरोधात हुंडाबळीचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. मात्र, प्रियांकाच्या मृत्यून परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आहे. तर, तिच्या आकस्मिक मृत्यूने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, प्रियकांचे मृत्यूच्या पाच दिवसांआधीच फोनवरुन तिच्या आईशी बोलणे झाले होते. तेव्हा तिने सासरची लोकं मला जीवे मारतील अशी भितीही बोलून दाखवली होती. त्यावर तिच्या आईने तिला धीर देत आपण यावर तोडगा काढू असा विश्वास दिला होता. प्रियांकाची आई व बहिण याप्रकरणी तिच्या सासरी बोलणी करायला जाणारच होते पण त्यापूर्वीच तिच्या मृत्यूची बातमी आली. या घटनेने तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.