पेटवलेल्या फटाक्यावर बसण्याची पैज जीवावर बेतली; हादरवणारा घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Man Sits On Firecracker Video Goes Viral: हा संपूर्ण घटनाक्रम तिथेच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. नेमका घटनाक्रम या व्हिडीओमध्ये दिसत असून स्फोटानंतर काय झालं हे ही पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 5, 2024, 12:49 PM IST
पेटवलेल्या फटाक्यावर बसण्याची पैज जीवावर बेतली; हादरवणारा घटनाक्रम CCTV मध्ये कैद title=
धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Man Sits On Firecracker Video Goes Viral:  मस्करीची कुस्करी होणे हा शब्दप्रयोग यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकला असेल किंवा वापरलाही असेल. मात्र बंगळुरुमध्ये खरोखरच काही मित्रांनी लावलेल्या पैजेमुळे एकाला प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणाच्या मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सर्वजण दारु प्यायले अन्...

दिवाळीच्या सेलिब्रेशनदरम्यान काही मित्रांनी फटाके फोडताना जळत्या फटाक्यांवर बसण्याची पैज लावली. मात्र ही पैज पूर्ण करण्याच्या नादात ग्रुपमधील एकाने प्राण मगावले. मिळालेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या तरुणाचं नाव सबरीश असं असून तो 32 वर्षांचा होता. जळत्या स्फोटकांवर बसण्याचं आव्हान स्वीकारताना सबरीश हा मद्यधुंदावस्थेत होता अशी माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाके फोडण्यापूर्वी या ग्रुपमधील सर्वच तरुणांनी मद्यपान केलं होतं. त्यामुळेच त्यांनी ही अशी विचित्र पैज लावली होती. 

काय पैज लागली होती?

मोठा फटाका लावून त्यावर कार्डबोर्डचा बॉक्स टाकून बसणाऱ्याला इतर सर्वजण काँट्री काढून रिक्षा विकत घेऊन देतील अशी पैज लावण्यात आली. ही पैज स्वीकारण्यास कोणीही तयार नव्हतं. मात्र सबरीशने हे आव्हान स्वीकारलं. सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या व्हिडीओत सबरीश एका चौकोनी खोक्यावर बसला आहे. त्याचे मित्र त्याच्या आजूबाजूला घोळका करुन उभे असल्याचं दिसत आहे. त्यापैकी एकजण या बॉक्स खालील शक्तीशाली फटाक्याची वात पेटवतो. त्यानंतर सबरीशचे मित्र त्याच्यापासून दूर जाऊन उभे राहतात.

नक्की पाहा >> 'काका, कितीची साडी दाखवू?' ऐकताच ग्राहक संतापला! 10-15 मित्रांना घेऊन आला अन्...; पाहा CCTV

फटाका फुटतो अन्...

बॉक्सखाली फटाका पेटत असताना सबरीश त्यावर बसलेला असतो आणि तितक्यात हा फटका फुटतो. हा फटाका फुटल्यानंतर सबरीश थोडा हवेत उडाल्यासारखा दिसतो. सगळीकडे धूर धूर होतो. त्यानंतर लगेच सबरीशचे मित्र पळत त्याच्याजवळ येतात. धुरामुळे कोणाला काही स्पष्ट दिसत नसल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर जाणवतं. दरम्यान दुसरीकडे सबरीश तोपर्यंत जमिनीवर कोसळलेला दिसतो. 

1)

2)

कसा झाला मृत्यू?

प्राथमिक अंदाजानुसार, फटाक्यांमधील ऊर्जेमुळे सबरीशच्या शरीरात अंतर्गत जखमा झाल्या आणि इंटरनल ऑर्गन डॅमेजमुळे त्याचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

गुन्हा दाखल

"या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे," अशी माहिती उपायुक्त लोकेश जगलासार यांनी दिली आहे.