नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. १० दिवसांपूर्वी पुलवामामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात भारत मातेने ४० वीर पूत्रांना गमावले. दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली. दशहशवादी हल्ल्यानंतर भारतीय वीर जवानांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी समोर आल्या. बिहारमधील भागलपूरच्या शाहीद रतन ठाकुर यांचे वडील रामिनिरंजन यांनी केलेले भाष्य अत्यंत प्रेरणात्मक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवान विजय शोरोन बद्दल बोलले. जेव्हा त्यांचे पार्थीव तिरंग्यात गुंडाळून झारखंडमध्ये त्यांच्या निवास स्थानी पोहचले तेव्हा त्यांच्या मुलाने सैन्यात जाण्याचे वक्तव्य केले. अशा अनेक गोष्टी प्रत्येक वीरजवानांच्या घरात बघायला मिळाल्या. 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी बिरसा मुंडा आणि जमशेद टाटा यांच्या अठवणींना उजाळा दिला. आताच्या तरुण पिढीला या दोन व्यक्तिंच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. जमशेद टाटा यांच्याकडे उत्तम प्रकारची दूरदृष्टी होती. त्यांनी फक्त भारताच्या भविष्याचा विचार केला. देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी भाई देसाई यांचा जन्म २९ फेब्रुवारी रोजी झाला होता. मोरारजी भाई हे देशातील सर्वात अनुशासित नेते होते. मोरारजी भाई देसाई यांच्या कार्यकाळात 44 व्या संविधानाचा शोध लागला.
देशभरात सध्या १० वी आणि १२ वी च्या परीक्षांचे वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शिक्षकांना सुद्धा शुभेच्छा दिल्या. निरोगी लोकशाही परंपरेचा सन्मान करत पुढील मन की बात मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थांना संबंधीत करत सांगितले. लोकसभेच्या निवडणुकी नंतर आता 'मन की बात' होणार असल्याचे त्यांनी सांगितले.