मुंबई : LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ झाली होती. केवळ फेब्रुवारीमध्ये सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाले होते. आज ही वाढ फक्त 26 दिवसांत एलपीजी 125 रुपयांनी महागला आहे.
दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतला जातो आणि नंतर 15 व्या दिवशी. त्यानंतर किंमती निश्चित केल्या जातात. आयओसीने (IOC) फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तीन वेळा वाढ केली. प्रथम 4 फेब्रुवारीला, दुसऱ्यांदा 14 फेब्रुवारीला आणि तिसऱ्यांदा 25 फेब्रुवारीला किंमत 25 रुपयांनी वाढविण्यात आली. आज मार्चच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महाग झाला आहे.
दिल्लीत अनुदानित एलपीजी सिलिंडर आता 25 रुपयांनी महाग झाला असून तो 819 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी ते 794 रुपये होता. त्याचप्रमाणे मुंबईतही एलपीजी सिलिंडरसाठी 819 रुपये द्यावे लागतील. एलपीजी सिलिंडरसाठी कोलकाताला जास्तीत जास्त 845.50 रुपये द्यावे लागतील, चेन्नईमध्ये ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी 835 रुपये द्यावे लागतील.
एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती डिसेंबरमध्ये दोनदा वाढविण्यात आल्या. 1 डिसेंबर रोजी सिंलडरचा दर 594 रुपयांवरून 644 रुपये करण्यात आला आणि नंतर 15 डिसेंबरला त्याची किंमत पुन्हा वाढवून 694 रुपये केली गेली. म्हणजेच एका महिन्यात 100 रुपयांची वाढ झाली. परंतु जानेवारीत किंमती वाढविण्यात आल्या नाहीत. जानेवारीत विना अनुदानित एलपीजीची (14.2 kg) किंमत 694 रुपये होती. फेब्रुवारीच्या सुरूवातीस, घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली गेली नव्हती आणि ती केवळ त्याच्या जुन्या किंमत 694 रुपयांत उपलब्ध होता.
1 फेब्रुवारीला किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती, परंतु 4 फेब्रुवारीला त्याचे दर पुन्हा 719 रुपये करण्यात आले. म्हणजेच 25 रुपयांची वाढ झाली. आणि पुन्हा एकदा, दहा दिवसातच एलपीजीच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली. यानंतर 25 फेब्रुवारी रोजी त्याची किंमत पुन्हा 769 रुपयांवरून 794 रुपयांवर गेली.
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनी आयओसीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथे कंपनी दरमहा नवीन दर जारी करते. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx आपण या संकेतस्थळावर आपल्या शहर गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.