नवी दिल्ली : दिल्ली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळाबर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. पण आम आदमी पक्षासोबत झालेली चर्चा फिस्कटल्याने ही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार्टीने काँग्रेस सोबत आघाडी करण्यास सकारात्मकता दाखवली नसल्याचे काँग्रेसच्या गोटातून कळत आहे. पण दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होण्याबद्दल मार्ग निघू शकतो अशी आशा जिवंत असल्याचे संकेतही देण्यात येत आहेत.
काँग्रेस पार्टी देशाची राजधानी दिल्लीच्या सर्व सात जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल अशी घोषणा काँग्रेसचे दिल्लीतील प्रभारी पीसी चाको यांनी केली. आम्ही अजूनही आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यास तयार आहोत पण ही आघाडी दिल्ली पुरतीच मर्यादित राहावी असेही ते म्हणाले.
जर चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातही काँग्रेसने आपसोबत आघाडी केली तरच दिल्लीतील आघाडी शक्य असल्याचे 'आप'तर्फे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या घोषणेनंतर आपने हरियाणामध्ये जननायक पण आम्ही केवळ दिल्लीमध्ये आजही आपसोबत आघाआडीस तयार आहोत असे संकेत काँग्रेसतर्फे मिळत आहेत.