मुंबई : भारतीय चलनात अनेक प्रकारच्या नोटा आहेत, परंतु प्रत्येक नोटांमध्ये अनेक प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. या सिक्युरिटी फीचर्सच्या माध्यमातून ही नोट खरी आहे की खोटी हे तपासता येते. नोटा बनवण्यासाठी विशेष प्रकारच्या शाई आणि छपाईचा वापर केला जातो, ज्यामुळे या नोटा सामान्य कागदांपेक्षा वेगळ्या असतात. एखाद्याकडून पैसे किंवा नोट स्वीकारताना तुम्हीही अनेक गोष्टींची काळजी घेतली असेलच. प्रत्येक जण आपआपल्या प्रकारे आणि माहितीप्रमाणे नोटीची तपासणी करतो. परंतु तुम्ही नोटांवर असलेल्या काळ्या रेषांना नीट पाहिलं आहे का? या रेषा का असतात याबद्दल फार कमी लोकांना महिती असेल.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नोटांवरील या काळ्यां रेषांबद्दल माहिती देणार आहोत.
या काळा रेषा त्या नोटबद्दल बरेच काही सांगतात आणि सिक्युरिटी फीचर्समध्ये देखील हे एक महत्त्वाचे चिन्ह आहे.
या रेषा 100 ते 2000 रुपयांच्या नोटांवर बनवल्या जातात. या रेषा खास बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक नोटीवर त्याचा वेगळा अर्थ आहे. वास्तविक, या ओळी अंध लोकांना लक्षात ठेवून बनवल्या आहेत आणि त्या विशेष प्रकारच्या छपाईने बनवल्या जातात. या छपाईला INTAGLIO किंवा एम्बॉस्ड प्रिंटिंग म्हणतात.
जेव्हा तुम्ही तुमच्या हातात कोणतीही नोट घ्याल आणि त्याला स्पर्श कराल, तेव्हा तुम्हाला तेथे थोडीसं उंचावलेलं हाताला लागेल, ज्यामुळे अंध व्यक्तीलाही त्या नोटीबद्दल माहिती मिळेल.
या विशेष प्रकारच्या छपाईने नोटीमध्ये अनेक गोष्टी बनवल्या जातात, ज्यात महात्मा गांधींचा फोटो, अशोक स्तंभ, काळ्या रेषा आणि ओळख चिन्ह इत्यादींचा समावेश आहे. नोटीवर, हे केवळ विशेष प्रकारच्या छपाईद्वारे तयार केले जातात. या काळ्या रेषाही या छपाईपासून बनवल्या आहेत आणि तुम्ही त्यांना हाताने स्पर्श करुन पाहू शकता ज्यामुळे, किती रुपयांची नोट आहे ते कळण्यास मदत होते. तसेच, ही ओळ वाकडी असते आणि ती नोटांच्या अगदी शेवटी बनवलेली असते.
100 रुपयांच्या नोटवर 4 ओळी आहेत, ज्यामध्ये 2-2 च्या सेटमध्ये 4 ओळी आहेत.
200 रुपयांच्या नोटवर फक्त 4 ओळी आहेत, ज्यात 2-2 चे संच आहेत. पण, या 2-2 ओळींमध्ये 2 ठिपके देखील आहेत, ज्यावरून हे समजू शकते की ही 200 रुपयांची नोट आहे.
500 रुपयांच्या नोटवर 5 ओळी आहेत, ज्या 2-1-2 च्या सेटमध्ये आहेत.
2000 रुपयांच्या नोटवर 7 ओळी आहेत, ज्या 1-2-1-2-1 च्या सेटमध्ये आहेत.
सध्या देशात 2000, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयाच्या नोटा चलनात आहेत. 2016 मध्ये नोटबंदीनंतर एक हजाराच्या नोटा चलनाच्या बाहेर झाल्या होत्या. रिझर्व्ह बँक 1956 पासून चलनी नोटांच्या छपाईसाठी ‘मिनिमम रिजर्व सिस्टम’ अंतर्गत चलन छापते. या नियमानुसार, चलनी नोटा छपाईसाठी नेहमी किमान 200 कोटी रुपये राखीव ठेवणे आवश्यक आहे. यानंतरच रिझर्व्ह बँक चलनी नोटा छापू शकते.