LokSabha Elections 2019 : कर्नाटकात काँग्रेस- जेडीएसचे जागा वाटपानंतर उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल (सं) मध्ये जागावाटप झाले आहे.  त्यांच्याही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

ANI | Updated: Mar 13, 2019, 10:34 PM IST
LokSabha Elections 2019 : कर्नाटकात काँग्रेस- जेडीएसचे जागा वाटपानंतर उमेदवार जाहीर title=
This photo was tweeted by @RahulGandhi

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल (सं) मध्ये जागावाटप झाले आहे. कर्नाटकात काँग्रेस- जेडीएसच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसची ही तिसरी यादी आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत माजी अध्यक्ष सोनिया गांधी, विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांना तर दुसऱ्या यादीत सुशीलकुमार शिंदे, राज बब्बर, सावित्री फुले, नाना पाटोले, प्रिया दत्त यांना स्थान देण्यात आले आहे. कर्नाटकात काँग्रेसने २८ पैकी २० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर मित्र पक्ष संयुक्त जनता दलाला ८ जागा सोडल्या आहेत. त्यांच्याही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

LokSabha Elections 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस २० जागांवर लढणार असून जेडीएस ८ जागांवर लढणार आहे. जेडीएसने आधी १२ जागा मागितल्या होत्या. परंतु ८ जागा त्यांनी पदरात पाडून घेतल्या आहेत. ६ मार्च रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष आणि जेडीएसचे अध्यक्ष एचडी देवेगौडा यांची भेट झाली होती. कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा असून सध्या काँग्रेसचे १० खासदार आहेत. तर जेडीएसचे २ खासदार आहेत, भाजपचे गेल्यावेळी १६ खासदार निवडून आले होते.