How to book Tatkal Tickets: भारतीय रेल्वेनं (Indian Railway) प्रवास करणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सुट्टीच्या निमित्तानं असो किंवा मग आणखी कोणत्या कारणानं असो, दळवळणाच्या या खिशाला परवडणाऱ्या साधनानं प्रवास करत असताना प्रत्येकालाच दरवेळी काही नवे अनुभव येतात. हे अनुभव खुपकाही शिकवून जाणारे असतात. अनेकदा असं होतं की, ही प्रवास करणारी मंडळी इतकी तरबेज होतात की त्यांच्याकडे तिकीट बुकींगसाठी एकाहून एक सरस टीप्स आणि ट्रीक्स असतात.
सहसा एखाद्या ठिकाणी जाण्याचा आपला बेत पूर्वनियोजित असेल तर, त्या ठिकाणी जाण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच रेल्वे तिकीटाचं बुकींग केलं जातं. पण, काही प्रसंग असेही असतात जिथं अगदी शेवटच्या क्षणी रेल्वेचं तिकीट बुक करावं लागतं. अशा वेळी तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता फारच कमी. असं असलं तरीही रेल्वेच्या तात्काळ तिकीटाच्या सुविधेमुळं तुम्ही सहजपणे प्रवास करु शकता.
IRCTC कडून मूळ स्थानकावर अमुक एका रेल्वेचा प्रवास सुरु होण्याच्या एक दिवस आधी तात्काळ तिकीट विक्री सुरु होते. पण, ही तिकीट कन्फर्म कशी करायची? रेल्वेच्या एसी क्लास टिकट (2A/3A/CC/EC/3E)साठी तिकीट खिडकी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडते. तर, नॉन-एसी क्लास (SL/FC/2S) साठीची खिडकी 11 वाजता उघडते. ऑनलाईन तिकीट बुकींगचा पर्यायही तुम्ही वापरू शकता.
इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे तुम्ही जेव्हाकेव्हा तिकीट बुक करता तेव्हा ती शक्य तितकी लवकर करा. कन्फर्म तात्काळ तिकीटासाठीसुद्धा हाच नियम लागू होतो. त्यामुळं तुम्हाला Confirm tatkal ticket हवी असल्यास किमान दोन दिवस आधीच तिकीट बुक करा ज्यामुळं तुम्हाला Confirm सीट मिळण्यास मदत होईल.
तिकीट बुक करण्यासाठीची स्मार्ट टीप...
तुम्ही घरबसल्या तिकीट बुक करत आहात आणि तुमच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन अशी एकाहून अधिक उपकरणं आहेत, तर तिकीट सहजपणे बुक करता येऊ शकते. या पद्धतीनं तिकीट बुक केल्यास कुठेतरी कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं तिकीट बुक करताना तुम्ही या मार्गाचाही वापर करूच शकता.
तिकीट बुक करताना आणखी एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, तुमचं इंटरनेट कनेक्शन. तात्काळ असो किंवा मग सर्वसामान्य तिकीट, तुम्ही तिकीट बुक करत असताना इंटरनेट कनेक्शन uninterupted आहे ना, याकडे लक्ष द्या. यामुळं वेळही वाचतो आणि मनाजोगी सीटही सहजपणे बुक करता येऊ शकते.