गौतम अदानींच्या खिशात पडली अजून एक कंपनी? आता इतक्या कोटींची केली deal

अदानी पॉवर या कंपनीने एक मोठी डील केली आहे. 

Updated: Aug 21, 2022, 07:11 PM IST
गौतम अदानींच्या खिशात पडली अजून एक कंपनी? आता इतक्या कोटींची केली deal

Gautam Adani Deal : गौतम अदानी समूहाच्या अदानी पॉवर या कंपनीने एक मोठी डील केली आहे. अदानी समूह लवकरच एक मोठी (Giant) कंपनी विकत घेणार आहे. अदानी पॉवरने छत्तीसगडच्या DP Power या कंपनीचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. 7,017 कोटी रूपयांच्या एंटरप्राईझ मुल्यावर हा करार झाला आहे. दोन्ही कंपन्यामधील सामंजस्य करार (MOU) चा कालावधी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार या कराराचा कालावधी परस्पर संमतीने वाढवलाही जाऊ शकतो. अधिग्रहणामुळे कंपनीला छत्तीसगड राज्यात थर्मल पॉवरचा विस्तार करण्यास मदत होईल, अशी भुमिका अदानी पॉवरने मांडली आहे. 

डीबी पॉवर छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात 2x600 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्लांट चालवते. या कंपनीची स्थापना ऑक्टोबर 2006 मध्ये झाली. डिलिजंट पॉवर (DPPL) कडे सध्या DB पॉवरचे होल्डिंग्स आहेत. सध्या डीबी पॉवरकडे त्याच्या क्षमतेच्या 923.5 मेगावॅटसाठी दीर्घ आणि मध्यावधी वीज खरेदी करार आहेत. 

अदानी पॉवरचे शेअर्स BSE वर रु. 12.80 किंवा 3.20% वाढीसह 412.20 रुपयांवर बंद झाले. सोबतच कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 1,58,983.02 कोटी रुपये आहे. इतकेच नाही तर याआधीही कंपनीने 419 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. अदानी समुहा शेअर मार्केटमध्ये वेगाने व्यवहार करत आहे.