India Suspends Visa For Canada: भारताने गुरुवारी कॅनडीयन नागरिकांना व्हिसा देणं बंद केल्याची बातमी अचानक धडकली. 'ऑप्रेशन्स रिजन्स' म्हणजेच कामाकाजासंदर्भातील अडचणींचं कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचं नोटीफिकेशन व्हिजा अर्ज केल्या जाणाऱ्या वेबसाईटवर झळकत होतं. दोन्ही देशांमध्ये मागील काही दिवसांपासून खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच भारताच्या कॅनडामधील दूतावासाने तडकाफडकी हा निर्णय घेतल्याची चर्चा झाली. या निर्णयामुळे आता कोणत्याही कॅनडियन व्यक्तीला भारतात प्रवेश मिळणार नाही असं सांगितलं गेलं. मात्र या निर्णायसंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा सरकारनवतीने करण्यात आलेली नव्हती. कॅनडामधील भारतीय दुतासावाच्या वेबसाईटवर व्हिसा सेवा बंद असल्याचं नमूद करण्यात आल्याने ही बातमी चर्चेत आली. मात्र ज्या नोटीफिकेशनमुळे हा गोंधळ उडाला ते नोटिफिकेशन अचानक गायब झालं आहे.
नक्की वाचा >> Alert! कॅनडातील 10 लाख भारतीयांना मोदी सरकारचा इशारा; म्हणाले, 'कोणत्याही आणीबाणीच्या...'
भारतीय व्हिजासाठी ज्या वेबसाईटवरुन अर्ज केला जातो त्या वेबसाईटवर सेवा बंद असल्याचं नोटीफिकेशन दिसत होतं. "भारतीय मिशनकडून महत्त्वाची सूचना : कार्यकारी कारणांमुळे 21 सप्टेंबर 2023 पासून भारतीय व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हा निर्णय कायम राहील. पुढील माहितीसाठी बीएलएसची वेबसाईट चेक करत राहा," असा मेसेज या वेबसाईटवर झळकत होता. काही तासांमध्ये हे नोटीफिकेशन गायब झालं आहे.
नक्की वाचा >> भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? 'खऱ्या व्हिलन'ने काय केलंय पाहा
भारताने गुरुवारी कॅनडीयन नागरिकांना व्हिसा देणं बंद केल्याच्या बातम्या समोर आल्या. भारत कॅनडा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडात राहणाऱ्या नागरिकांसाठी मंगळवारीच इशारा जारी केला आहे. कॅनडामध्ये वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर “अत्यंत सावधगिरी” बाळगावी असा सल्ला भारताने कॅनडातील आपल्या नागरिकांना दिला आहे. मंगळवारी रात्री कॅनडाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा धोका असल्याचं कारण देत कॅनडियन नागरिकांना जम्मू-काश्मीरबरोबरच लडाखमध्ये न जाण्यासंदर्भातील निर्देश देणारं पत्रक जारी केल्यानंतर आता भारतानेही अशाच पद्धतीचं पत्रक कॅनडातील भारतीयांसाठी जारी केलं आहे.
नक्की पाहा >> भारत-कॅनडा वादात अक्षय कुमार ट्रोल! Memes चा पडला पाऊस; पाहा मिम्स, जाणून घ्या कारण
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीमध्ये झालेल्या जी-20 परिषदेदरम्यान दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडियन पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोन्ही मुख्य नेत्यांमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांसंदर्भात झालेली चर्चा फारशी फलदायी ठरली नव्हती. त्यानंतर सोमवारी खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
कॅनडाने भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तडकाफडी मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने जशास तशी कारवाई करत कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश मंगळवारी दिले. तसेच ट्रूडो यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि बावळटपणाचे असल्याचंही भारताने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटलं.