30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले

मध्य प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशात एका व्यक्तीने 30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला होता. 

वनिता कांबळे | Updated: Jul 3, 2023, 12:09 AM IST
30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले  title=

Madhya Pradesh Crime News : पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने तिचा मृतदेह तब्बल 30  फ्रीज मध्ये ठेवला होता. शेजऱ्यांना या प्रकाराबाबत समजले. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्रीज मध्ये ठेवलेला मृतदेह ताब्यात घेतला. पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह फ्रीजमध्ये का ठेवला याचा तपास पोलिसांनी केला असता धक्कादायक कारण समोर आले. यामागचे सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले आहेत. मध्य प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

नेमका काय प्रकार घडला?

मध्य प्रदेशातील रीवा शहरात हा विचित्र प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्रीजरमधून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. तब्बल 30 तास या महिलेचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवण्यात आला होता. पतीने तिची हत्या केल्यानंतर मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला असा आरोप  मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. आजारपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला अस मृत महिलेच्या पतीने पोलिस तपासात सांगितले आहे. 

पोलिसांनी फ्रीजरमधून मृतदेह बाहेर काढला

रेवा शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिउला गावात हे दांम्पत्य राहते. तर, त्यांचा मुलगा कामानिमित्ताने मुंबईत असतो. भरत मिश्रा यांची पत्नी सुमित्री यांचे 30 जूनच्या रात्री येथे निधन झाले. मात्र, महिलेच्या भावांना 2 जुलै रोजी तिच्या मृत्यूची बातमी समजली. शेजाऱ्यांनी मृत महिलेच्या नातेवाईंकाना तिच्या मृत्यूबाबत सांगितले. महिला मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. मृत महिलेचे नातेवाईक पोलिसांना घेऊन भरतच्या घरी पोहोचला. येथे पोलिसांनी फ्रीजरमधून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

मृतदेह फ्रीज मध्ये का ठेवला

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी भरत मिश्रा यांची कसून चौकशी केली. 30 जून रोजी आजारपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचे त्याने पोलिसांना. पत्नीच्या मृत्यूबाबत मी मुंबईत असलेल्या मुलाला सांगितले. मी आल्याशिवाय आईवर अंत्यसंस्कार करु नका त्याने असे मला सांगितले. यामुळे मुलगा गावी येईपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी मी मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. लायन्स क्लबकडून फ्रीझर मागवल्याचे भरत यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले. पोलिस त्यांच्या मुलाशी देखील चौकशी करत आहेत. पोस्टमार्टेम निकालानंतर महिलेच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल.