मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या एकूण ४० जवानांनी देशाच्या संरक्षणसाठी आपल्या प्रणाची आहूती दिली. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीद घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर हल्ला चढवला. केलेल्या हवाई हल्ल्यात एकूण ४० ते ५० दहशतवद्यांचा खात्मा करण्यात आला होता. पण देशाच्या या वीर पुत्रांची कामगिरी अभिनेता सनी देओलला माहित नसल्याचे समोर येत आहे. गुरदासपूर येथे एका रोड शोदरम्यान त्याला बालाकोट विषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सर्वांना अजब वाटणारे वक्तव्य केले.
सनी देओल म्हणाला की, 'मला बालाकोट स्ट्राईक बद्दल काही कल्पना नाही, मी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. सध्या माझे एकच ध्येय आहे, ते म्हणजे लोकसभा निवडणूक.. मी आधी लढेल, जिंकेल आणि देशाची सेवा करेल'
नेहमी चित्रपटाच्या माध्यमातून देशभक्तीचे जोरजोरत डंके वाजणारा सनी देओल बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
संरक्षण मंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितित अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्यात आली. सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहे.