Wife Eat Gutka Drives Bullet Husband Fustrated: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका महिलेला गुटखा खाण्याची सवय असल्याने तिचा पती तिला इतका वैतागला की प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत गेलं आहे. माझी पत्नी तोंडात गुटखा ठेऊन वेगाने बुलेट चालवते, हे आपल्याला अजिबात पसंत नाही. आपण तिला गुटखा खाण्यापासून रोखल्यास ती वाद घालते. पतीने दिलेल्या माहितीनुसार पत्नीला लग्नाच्या आधापासूनच गुटखा खाऊन, वेगवाने बाईकवरुन गावभर फिरण्याची सवय होती. मात्र तिने ही गोष्ट तिच्या होणाऱ्या पतीपासून लपवून ठेवली. आता लग्नानंतर पतीला पत्नीच्या या सवयीचा तिरस्कार वाटू लागला असला तरी पत्नी ही सवय सोडण्यास तयार नाही. यावरुनच दोघांमध्ये वारंवार वाद होत आहेत.
पतीला आता पत्नीबरोबर राहण्याची अजिबात इच्छा नाही. मात्र पतीबरोबर सतत गुटख्यावरुन होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीनेच पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण कुंटुंब समोपदेशन केंद्राकडे सोपवलं आहे. सध्या हे जोडपं त्यांच्या वेगळ्याच समस्येमुळे पंचक्रोषीत चर्चेचा विषय ठरत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जगदीशपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या या तरुणीचं लग्न या तरुणाशी झालं. चार वर्षांपूर्वी म्हणजे 2020 च्या सुरुवातीला या दोघांचं लग्न मोठ्या धुमधडाक्यामध्ये लावून देण्यात आलं. लग्नानंतर दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होती. मात्र हळूहळू दिवस पुढे सरु लागले तसं पतीला समजलं की पत्नीला गुटखा खाण्याची सवय आहे. तसेच नंतर पत्नीला बुलेट चालवायला आवडते असंही या तरुणाला समजलं.
पीडित तरुण जगदीशपुरा येथील एका बुटांच्या कारखान्यामध्ये कामगार आहे. 300 रुपये रोजावर तो काम करतो. या तरुणाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. या तरुणाचे आई-वडील जुन्या पडक्या घरात राहतात. मात्र या पडक्या घरात राहणार नाही असं सुनेनं सांगितल्यानंतर या तरुणाच्या वडिलांनी नवं घर बांधून दिलं. इथं दोघं राहू लागल्यानंतर पत्नीची गुटखा खाण्याची सवय असल्याचं पतीला समजलं आणि नंतर यामधूनच पत्नी त्याला त्रास देऊ लागली. पतीकडे गुटखा खाण्यासाठी आणि बुलेटमधील इंधनासाठी ती वारंवार पैशांची मागणी करु लागली. रोज ती पतीला त्रास देऊ लागली. यावरुनच दोघांवर वाद सुरु झाली. लग्नाच्या 3 वर्षानंतर 2023 च्या शेवटच्या महिन्यापासून दोघांमध्ये रोज खटके उडू लागले.
नक्की वाचा >> Rare Disease: 24 तास कामोत्तेजनेने ग्रस्त आहे 'ही' तरुणी, 100 पैकी एकाला असतो हा आजार
पत्नीच्या रोजच्या जाचाला कंटाळून हा तरुण आपल्या आई-वडिलांबरोबर जुन्या घरात जाऊन राहू लागला. आता पत्नीने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कुटुंब समोपदेशन केंद्रात दोघांचं समोपदेशन करण्यात आलं आहे. यावेळेस पतीने रोज पत्नी गुटखा आणि पेट्रोलसाठी पैसे मागते. मी एवढे पैसे रोज कुठून आणून देऊ? असं विचारत आपली हतबलता व्यक्त केली. तर दुसरीकडे पत्नीने आपण लग्नाच्या आधीपासूनच गुटखा खात असून बुलेटही आधीपासूनच चालवतो. माझ्या वडिलांनी मला बुलेट घेऊन दिली असून मी वयाच्या 18 व्या वर्षापासूनच बुलेट चालवते.
नक्की वाचा >> दीराने दुष्कृत्य केल्यानंतर पती म्हणाला, 'आजपासून तू माझी बायको नाही तर वहिनी आहेस'
जोपर्यंत पत्नी गुटखा आणि बुलेट चालवणं सोडत नाही तोपर्यंत मी तिच्यासोबत राहणार नाही, असं या तरुणाने स्पष्ट केलं आहे. पत्नीने माहेरी राहू नये. मी वडिलांनी बांधून दिलेल्या घरात तिच्यासोबत राहायला तयार आहे, असं तरुणाने सांगितलं आहे.