मुंबई : तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला आता अवघे काही तास उरले आहेत. पॅन आणि आधार लिंक करायचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज पॅन आणि आधार लिंक केलं नाही तर ते रद्दही होऊ शकतं. तसंच तुम्हाला ५ हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. एवढेच नाही तर 31 जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासही तुम्हाला अनेक बाबींचा सामना करावा लागेल. आयकर विभागाने ही तारीख वाढविण्यास नकार दिलाय. केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत बँक अकाउंट, पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी 30 जून ही डेडलाइन दिलेली आहे. आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.
https://portal.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaa...
ही लिंक ओपन केल्यानंतर आलेला फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तुमचा पॅन कार्डनंबर हाच तुमचा आयडी असतो. हा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मोबाईल आणि मेल आयडीवर ओटीपी(वन टाईम पासवर्ड) येईल. हा ओटीपी नंबर टाकल्यानंतर तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल.