मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, ज्या शुभ किंवा अशुभ असतात. वास्तुशास्त्रात शुभ-अशुभ याला महत्वाचे स्थाना आहे. आपण जागा किंवा दिवस हे शुभ किंवा अशुभ असल्याचे एकले आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की संख्या देखील शुभ किंवा अशुभ असू शकते. हो वास्तुशास्त्रात संख्यांना देखील फार महत्व आहे. त्यामुळेच तुम्ही कधी फिरायला किंवा हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला जाणवेल की, बहुतांश हॉटेलमध्ये 13 क्रमांकाची खोली किंवा 13 वा मजला नसतो. कारण बरेच लोक या क्रमांकाला अशुभ मानतात.
वास्तविक, पाश्चात्य देशांमध्ये 13 हा आकडा खूप अशुभ मानला जातो. जे पाहता आता भारतातील अनेकांनी याचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. अनेक हॉटेल्समध्ये रूम नंबर 12 नंतर थेट रूम नंबर 14 असतो. परंतु तुम्हाला 13 क्रमांक दिसणार नाही.
परंतु हे समजून घ्या की, असे प्रत्येक हॉटेलमध्ये होत नाही, तर काही ठरावीक हॉटेलमध्ये ही मान्यता आहे.
आता 13 नंबर हा अशुभ का मानला जातो, यामागे अनेक कारणं आहेत. आता ही कारणं कोणती ते जाणून घ्या.
परदेशात 13 व्या क्रमांकाबाबत लोकांच्या मनात अनेक भीती आहेत. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीने प्रभु येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला, तो त्यांच्यासोबतच्या तेराव्या खुर्चीवर बसला होता. या कारणास्तव तिथले लोक 13 नंबरला चांगला मानत नाहीत. याच कारामुळे 13 नंबरची भीती पाश्चात्य संस्कृतीत इतकी आहे की, तेथील इमारतीतही 12व्या मजल्यानंतर थेट 14वा मजला बांधला जातो.
अनेक परदेशी लोक भारतात भेट देण्यासाठी येतात. अशा स्थितीत या लोकांचा विश्वास लक्षात घेता भारतात देखील अनेक हॉटेल्समध्ये 13 क्रमांकाची खोली नाही.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)