Air India Meal : एअर इंडिया विमानात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावरुन आात नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर ( Manickam Tagore) यांनी एअर इंडियाच्या वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत हिंदू-मुस्लीम मील (Hindu-Moslem Meal) काय असतं? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे कारवाईची मागणी करत मणिकन टॅगोर यांनी 'संघाने एअर इंडिया ताब्यात घेतली आहे का?' अशी टीकाही केलीय. एअर इंडियाच्या मेनूमध्ये धर्मावर आधारित अन्न कधी समाविष्ट केले गेलं? हे स्पष्ट झालेलं नाही. पण आहाराला प्राधान्य देण्याऐवजी धर्मावर आधारित मेन्यू तयार केल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. एअर इंडियाच्या मांसाहारी भोजणात गोमांस किंवा डुकरांचं मांस दिलं जात नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.
एअर इंडियाच्या वेबसाईटवर जेवणाच्या पानावर प्रवाशआंना विमानात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती देण्यात आली आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींची समृद्धता लक्षात घेऊन विविध खाद्य पर्यायांसह, आम्ही सर्वांसाठी स्वादिष्ट पदार्थ देतो' असं या पानावर लिहिण्यात आलं आहे. यात मधुमेही रुग्णांसह लहान मुलांपर्यंत विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. पण धर्मावरीत आधारीत खाद्यपदार्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
हिंदू-मुस्लीम मील
हिंदूच्या भोजणासंदर्भात एअर इंडियाने हिंदू प्रवाशांसाठी भारतीय पाककृतीमध्ये तयार केलेल्या मेनूमध्ये चिकन, मासे, अंडी, भाज्या, स्टार्च किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. तर मुस्लिम समाजातील प्रवाशांसाठीच्या मेन्यूत मुस्लिम आहाराच्या गरजेनुसार प्रमाणित हलाल किचनमध्ये तयार केला जातो, असं लिहिण्यात आलं आहे.
<
Hindu meal, Moslem meal at @airindia flights.
What's a Hindu Meal and Moslem Meal?Have Sanghis captured Air India?
Hope the new @MoCA_GoI takes action. pic.twitter.com/JTEYWPViYX
— Manickam Tagore .(@manickamtagore) June 17, 2024
जैन आणि ज्यूंसाठीही स्वतंत्र मेनू
याशिवाय एअर इंडियाने ज्यू समुदायाशी संबंधित प्रवाशांसाठी प्रमाणित कोशेर किचनमध्ये त्यांच्या गरजेनुसार तयार केलेले अन्न पुरवलं जाईल असं म्हटलंय. हे जेवण केवळ विशिष्ट आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये उपलब्ध आहे. तर जैन समाजाच्या प्रवाशांसाठी भारतीय शैलीत तयार करण्यात आलेल्या मेनूमध्ये कांदा, लसूण किंवा अॅनिमल प्रोडक्ट समावेश नसेल, असंही लिहिण्यात आलं आहे.
कोण आहेत काँग्रेस नेते मणिकम टागोर?
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तामिळनाडूच्या विरुधुनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेवार मणिकम टागोर विजयी झाले. 2009 आणि 2104 मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 2009 मध्ये ते जिंकून आले होते. तर 2014 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मणिकम टागोर यांनी बंगळुरु विद्यापिठातून एलएलबीची पदवी मिळवली आहे.