हार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अ‍ॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!

Heart Attack : काल, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे विराजमान झाले. या कार्यक्रमाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपल्या राहत्या ठिकाणी विविध पद्धतीने आनंद आणि दिवाळी साजरी केली. तर दुसरीकडे रामलीला सादर करताना एका कलाकाराचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याची घटना समोर आहे.  

Updated: Jan 23, 2024, 03:38 PM IST
हार्ट अटॅकने तडफडत होता हनुमानाची भूमिका साकारणारा, अ‍ॅक्टिंग समजून टाळ्या वाजवत होते लोक!   title=

Heart Attack While Performing Ramleela : अयोध्येतील राम मंदिराचे भव्य दिव्य उद्घाटन काल पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. म्हणजे देशभरात दिव्यांचा सण साजरा झाला. यासोबतच अनेक ठिकाणी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हरियाणातील भिवानी येथे सोमवारी दुपारी रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीच एक दुःखद घटना समोर आली. 

हरियाणातील भवानी येथे देखील प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होतं. येथील नागरिकांनी कार्यक्रमात रामलीला आयोजित केली होती. यामध्ये 25 वर्षीय तरुण हनुमानाने देवाची भूमिका साकारली होती. या अभिनय करताना त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सदर घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण हनुमानाचं पात्र साकारत आहे. सर्व भाविक आनंदाने ही रामलीला पाहत आहेत.  तितक्यात हनुमान साकारलेल्या भूमिकेत असलेल्या तरुणाला  हार्टअ‍ॅटक येतो आणि तो खाली कोसळतो. सुरुवातीला उपस्थितांना तो नाटक करत असावा  असं वाटतं होते. मात्र बऱ्याचवेळा तो जागेवर पडून राहतो. त्यानंतर सर्वजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. त्याची तब्येत पाहून उपस्थितांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर सांगतात. ही माहीती मिळताच तिथे उपस्थित सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता का? हरीश मेहता प्रभू रामाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या पायाजवळ कोसळतात. पहिल्यांदा वाटते की, भूमिका करताना भावुक होत हनुमान रामाच्या चरणांवर लीन होत आहेत. मात्र खूप वेळ झाली तरी काहीच हालचाल न झाल्यानं काहीतरी दु:खद घडल्याचं समोर आलं.  लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.  प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी सांगितले की, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.