Rakhi for Ram Rahim: हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमचा जलवा कमी होताना दिसत आहे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राम रहिमच्या नावाचे हजारो लिफाफे रोहतकच्या सुनारिया तुरुंगात पोहोचायचे.
राखीसोबतच राम रहिमसाठी मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्डही आले आहेत. मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये यंदाच्या रक्षाबंधनाला कमी राख्या आल्या आहेत. गेल्या 7 दिवसांत शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमला त्याच्या समर्थकांनी केवळ 1,334 राख्या पाठवल्या आहेत. गेल्या वर्षी 27 हजार राख्या पाठवण्यात आल्या होत्या. राम रहिमला यावेळी कमी राख्या आल्याने टपाल खात्याला फटका बसला आहे.
गेल्या 4 वर्षांपासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे. जेव्हा जेव्हा रक्षाबंधनाचा सण येतो तेव्हा जवळपास 10 ते 15 दिवस गुरमीत राम रहिमच्या नावावर असलेल्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात राख्या येत असतात. टपाल कर्मचाऱ्यांना रोहतकच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधून सुनारियाच्या पोस्ट ऑफिसमध्ये राखीची पत्रं पोती भरून आणावी लागायची. पोती रिक्षा भाड्याने करून आणावी लागत असायतीच.
दरम्यान, राम रहिम पॅरोलच्या नावावर, कधी उपचाराच्या नावाखाली राम रहिम तुरुंगातून बाहेर आला आहे. तेव्हा त्याच्या अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं.