गुजरात निवडणूक : भाजपाला जोरदार दणका, कॉंग्रेसची मुसंडी

 भाजपा ८७ जागांवर स्थीर असून कॉंग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. 

Updated: Dec 18, 2017, 09:08 AM IST
गुजरात निवडणूक : भाजपाला जोरदार दणका, कॉंग्रेसची मुसंडी  title=

गुजरात :  गुजरात निवडणूकीत भाजपाला कॉंग्रेसने जोरदार दणका दिल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा ८७ जागांवर स्थीर असून कॉंग्रेस ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पिछाडीवर असलेले पाहायला मिळत आहे. 
 
 दरम्यान,  गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी 9 डिसेंबरला (89 विधानसभा जागा) तर, 14 डिसेंबरला (93 विधानसभा जागा ) दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. गुजरातसोबतच हिमाचल प्रदेशमध्येही निवडणुका पार पडल्या. या मतदानाची एकूण मतमोजणी आज (सोमवार) पार पडत आहे. गुजरात निवडणुकीसाठी 50,128 पोलिंग बूथ बनविण्यात आले होते. गोवा नंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात ही दोन राज्ये अशी आहेत. ज्यात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला गेला.