खूशखबर! आता पोस्टाचे व्यवहार नेटबँकिंग द्वारे करता येणार

पोस्टाने नेट बँकिंग सुविधा सुरु केली आहे.

Updated: Dec 15, 2018, 07:14 PM IST
खूशखबर! आता पोस्टाचे व्यवहार नेटबँकिंग द्वारे करता येणार title=

मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात सर्वकाही सोप्पं झालयं. ऑनलाईन पद्धतीमुळे बँकेचे व्यवहार तर आपण अनेकदा मोबाईलवरुनच करतो. इंटरनेट बँकिंगमुळे पैसे पाठवणं अगदी सोप्पं झालं आहे. आता पोस्टाने नेट बँकिंग सुविधा सुरु केली आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे. त्यामुळे याचा फायदा अनेकांना होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, पोस्टात खाते असणं गरजेच आहे. नेटबँकिग सुविधा सुरु करण्यासाठी तु्म्हाला https://ebanking.indiapost.gov.in/  या लिंकवर जावे लागेल. 

असे करा अर्ज

पोस्टात खाते असलेल्या खातेधारकांनी आपल्या पोस्ट ऑफिसला जाऊन एक फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून नेट बॅंकिंग सुविधा वापरता येईल. यानंतर नेट बँकिंगची सुविधा सुरु झाल्यावर खातेधारकाला मेसेजद्वारे कळवण्यात येईल. इंटरनेट बँकिंग सेवा सुरु झाल्यानंतर खातेधारकाला पोस्टाच्या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे new user activation ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे कस्टमर आयडी, सीआयएफ आयडी आणि अकाउंट आयडी इत्यादी तपशील भरावे लागतील.