सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेटचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 13, 2024, 11:14 AM IST
सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेटचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठाल  title=
Gold Rate Today 13th June 2024 price of gold and silver fall check latest rates

Gold Rate Today: कमोडिटी बाजारात गुरुवारी 13 जून रोजी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. सोनं MCXवर 400 रुपयांनी घसरले आहे. तर, चांदी सुरुवातीला 2000 रुपयांनी घसरली होती. मात्र, त्यानंतर आणखी 100 रुपयांची घसरण झाली. त्यामुळं आता चांदीच्या दरात 2100 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सातत्यानी होत असलेली घसरण पाहून ग्राहकांना सोनं खरेदीची ही चांगली संधी आहे. 

भारतीय वायदे बाजारात आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोनं 634 रुपयांनी घसरुन 71,336 वर स्थिर झाले आहे. बुधवारी सोनं 71,970 रुपयांवर स्थिर झाले होते. तर, आज चांदीच्या दरात 2.35 टक्क्यांनी म्हणजेच 2125 रुपयांनी घसरून 88,320 रुपयांवर स्थिर झाली आहे. बुधवारी चांदीचा व्यवहार 90,445 रुपयांवर स्थिर झाला होता. आंतरराष्ट्रीय बेंचमार्कमधील घसरण हे यामागचे कारण आहे. चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात 1 महिन्याच्या निच्चांकी पातळीवर आहे. इतर मौल्यवान धातुंच्या किमतीतही दीड टक्क्यांची घसरण झाली आहे.LME कॉपरमध्ये 100 डॉलरचे करेक्शन आलं आहे. त्याचबरोबर, लेड, झिंक, अॅल्युमिनियममध्येही घसरण झाल्याचे पाहायला मिळतंय. 

यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांवरील शक्यता हे या मागचं कारण असू शकत. वास्तविक, गेल्या वर्षी डिसेंबरपासून सहा दरांच्या कपातीची चर्चा होती. परंतु आता फेडने फक्त एकच दर कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भावांनी उसळी घेतली होती. पण आजच्या व्यवहारात धातूंचा मूड बिघडलेला दिसतोय. व्याजदरात कपात न केल्यामुळे, सोन्या-चांदीची होल्डिंग कॉस्ट किंवा संधी खर्च वाढतो, व्याजदर कमी झाल्यास हा खर्च कमी होतो आणि मागणीही सुधारते, अशा परिस्थितीत त्यांच्यात विक्री होऊ शकते.

24 कॅरेट सोन्याचे दर 

1 ग्रॅम- 7,158
8 ग्रॅम-  57,264
10 ग्रॅम- 71,580

22 कॅरेट सोन्याचे दर

1 ग्रॅम- 6,557
8 ग्रॅम-52,456
10 ग्रॅम-  65,570

मुंबई पुण्यात सोन्याचे दर

मुंबई-  72,170
पुणे-  72,170
नागपूर- 72,170