ऐन सणासुदीत सोन्याचे दर पुन्हा वाढले, आज 24 कॅरेटचा भाव किती?

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घेऊया आज काय आहेत दर 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 16, 2024, 12:24 PM IST
ऐन सणासुदीत सोन्याचे दर पुन्हा वाढले, आज 24 कॅरेटचा भाव किती? title=
Gold price today on 16th October 2024 gold and silver price gains on MCX check rates

Gold Price Today: सणासुदीचे दिवस सुरू होण्याच्या आधीच सातत्याने सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. आज बुधवारी सकाळी वायदे बाजारात सोनं महागलं आहे. दोन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आज सोनं वधारलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. आज किती रुपयांनी वाढले सोन्याचे भाव जाणून घेऊया. 

व्यापारी व स्थानिक विक्रेत्यांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे कारण म्हणजे मागणीत वाढ. तसंच, फेडरल रिझर्वकडून गुंतवणुकदारांना अमेरिकेच्या व्याज दर आणि इतर संकेताची प्रतीक्षा आहे. या कारणांमुळंही सोन्याच्या किंमतीत स्थिरता आली आहे. तसंच, इतर देशातील युद्धजन्य परिस्थितीचाही मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

आज सोन्याच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 77,890 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. चांदीची किंमत 1हजारांनी घसरून 92,500 रुपये प्रतिकिलोग्रामवर पोहोचली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 450 रुपयांनी घसरुन 71,400 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 58,420 रुपयांवर आज स्थिरावले आहेत. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71,400 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,890रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,420 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,140 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 789 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 842 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,120 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,312 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,420 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 71,400 रुपये
24 कॅरेट-  77,890रुपये
18 कॅरेट- 58,420 रुपये