मुंबई : पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि शेअर बाजारातील निच्चांक यामुळे सोनं महागलं आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जवळपास 555 रुपयांनी वाढले आहेत. 10 ग्रॅम सोनं 32000 च्या वर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे चांदीचे दरही 39,000 रुपयांच्या वर पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया 73.91 रुपये प्रति डॉलर झाल्याने आयात शुल्क महागलं आहे. यामुळे सोनं महागलं आहे. सिंगापूरमध्ये सोनं 0.32 टक्क्यांनी वाढलं आहे. त्यामुळे सोनं 1,207.60 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.
राजधानी दिल्लीमध्ये 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रम 555-555 रुपयांनी वाढलं आहे. त्यामुळे त्याचे दर अनुक्रमे 32,030 रुपये आणि 31,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
याआधी सोमवारी सोन्यामध्ये 150 रुपयांची घसरण झाली होतं. त्यानंतर गांधी जयंतीला दोन ऑक्टोबरला सराफा बाजार बंद होतं. त्यामुळे बुधवारी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. चांदी 450 रुपयांनी वाढली असून 39,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.