बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय २५ लाखांचं लोन, असे करा अर्ज

जर तुम्ही तुमचा स्वत:चा नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल पैशां अभावी तो रखडत असेल तर आता चिंता सोडा. आता सरकार तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समोर आलं आहे.

Updated: Sep 20, 2017, 11:54 AM IST
बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय २५ लाखांचं लोन, असे करा अर्ज title=

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमचा स्वत:चा नवा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल पैशां अभावी तो रखडत असेल तर आता चिंता सोडा. आता सरकार तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समोर आलं आहे.

सरकार नवीन बिझनेस उभा करण्यासाठी २५ लाखांपर्यंतचं लोन देत आहे. इतकेच नाही तर हे लोन सरकार स्वस्त व्याज दराने देत आहे. 

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया(सीडबी)च्या स्माईल स्कीमनुसार हे लोन दिलं जात आहे. या स्कीमनुसार सरकार दोन प्रकारचे लोन देत आहे. एक म्हणजे सर्व्हिस सेक्टरसाठी वेगळं लोन आणि दुसरं म्हणजे मॅन्यूफॅक्चरिंगसाठी वेगळं लोन दिलं जातं. जर तुम्हाला सर्व्हिस सेक्टरशी संबंधीत बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला १५ लाख रूपयांपर्यंतच लोन मिळेल. आणि जर मॅन्यूफॅक्चरिंग बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला २५ लाख रूपयांपर्यंत लोन मिळेल. 

१५ ते ३५ टक्के सबसिडी

या स्कीमची खासियत म्हणजे सरकार यावर १५ ते ३५ टक्के सबसिडी देत आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीत आहात आणि तुमचं युनिट अर्बन परिसरात आहे तर तुम्हाला १५ टक्के आणि ग्रामीण परिसरात असाल तर २५ टक्के सबसिडी मिळू शकते. जर तुम्ही स्पेशल कॅटेगरी म्हणजेच एससी, एसटी, मायनॉरिती, वुमन, एक्स सर्व्हिस मॅन, अंपग यातून असाल आणि तुम्ही अर्बन परिसरातील असाल तर तुम्हाला २५ टक्के आणि ग्रामीण भागातील असाल तर ३५ टक्के सबसिडी मिळू शकते. 

कसे कराल अर्ज 

तुम्ही या लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. पण अर्ज करण्याआधी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल. या कामातही सरकार तुमची मदत करू शकते. सरकारने केवीआयसी आणि पीएमईजीपीच्या वेबसाईटवर अनेक प्रोजेक्ट फाईल्स अपलोड केल्या आहेत. ते बघून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करू शकता. खालील दिलेल्या लिंकवर तुम्ही लोनसाठी अप्लाय करू शकता. 

https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp