मुंबई : भारतीय नौदलच्या इतिहासात प्रथमच 'ऑब्जर्वर' (Indian naval aviation)म्हणून हेलिकॉप्टर स्ट्रीममध्ये 2 महिला अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. सब लेफ्टिनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टिनंट रिती सिंह असं या दोन महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.
युद्धनौके वरुन चालविणाऱ्या हवाई लढाईत भाग घेणारी ही महिला योद्धाची पहिली तुकडी असेल. यापूर्वी, महिलांना फक्त विंग एअरक्राफ्टपर्यंतच ठेवले जात होते. ते तटावरुनच उड्डाण करायचे आणि तटावरच उतरायचे.
महिला योद्धाची प्रथम तुकडी
२१ सप्टेंबर रोजी कोची येथील आयएनएस गरुड येथे झालेल्या कार्यक्रमात या दोन महिला अधिकारी १७ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या गटाचा भाग होते. ज्यांचा 'विंग्स' देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी रीअर अॅडमिरल अँटनी जॉर्ज यांनी पदवीधर झाल्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि म्हटले की, हा ऐतिहासिक प्रसंग असून प्रथमच हेलिकॉप्टर ऑपरेशनसाठी महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्या भारतीय नौदलातील अग्रगण्य युद्धनौकामध्ये महिलांचा मार्ग मोकळा करतील.
या समारंभाचे अध्यक्ष रियर अॅडमिरल अँटनी जॉर्ज होते, जे प्रशिक्षणाचे चीफ स्टाफ अधिकारी आहेत. त्यांनी सर्व पदवीधर अधिकाऱ्यांना पुरस्कार आणि विंग देऊन सन्मानित केले.
91 व्या रेग्युलर कोर्स आणि 22 व्या एसएससी ऑब्झर्व्हर कोर्सचे हे अधिकारी हवाई नेव्हिगेशन, फ्लाइट प्रक्रिया, हवाई लढाऊ रणनीती, पाणबुडी-विरोधी युद्ध इत्यादींचे प्रशिक्षण घेत आहेत.