मुंबई : स्वर्गाबद्दल तुम्ही आजवर खूप काही ऐकलं असेल. मात्र आता याच स्वर्गाच्या दाराचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हीडिओनं सोशल मीडियात अक्षरश: धूमाकूळ घातलाय. नेमका काय आहे हा सगळा प्रकार, चला पाहूयात. (fact check viral polkhol viral video gate of Heaven know what truth)
स्वर्गाबद्दल आजवर तुम्ही अनेक सुरस कथा ऐकल्या असतील. ब-याचशा सिनेमांमधून स्वर्गाची संकल्पना पाहिलीही असेल. पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक असा व्हिडिओ ज्यात आकाशात खरंखुरं स्वर्गाचं दार उघडल्याचा दावा केला जातोय.
हा व्हिडिओ पाहा. यात आकाशात हे डोळ्यांच पारणं फेडणारं दृष्य पाहायला मिळतंय. अंधारलेल्या आकाशात स्वर्गाचं तेज उजळून निघावं आणि स्वर्गात येण्याचा मार्ग दिसावा असंच हे दृश्य.
तवारस ब्रिंसन नावाच्या व्यक्तीनं हा सगळा नजारा आपल्या मोबईलमध्ये कैद केलाय. तवारस फ्लोरिडातून सकाळच्या सुमारास घरी जात होता. तेव्हा त्याला आकाशात हे दृष्य दिसलं.
त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियात वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय. आता या व्हिडीओत दिसणारं दृश्य म्हणजे नेमकं काय आहे? यावरून नेटीझन्समध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्यायेत.
अनेकांनी याला निसर्गाचा आविष्कार म्हंटलंय. काहींनी हे रॉकेट लॉन्च असल्याचा दावा केलाय. अर्थात यावर संशोधकांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याला खरंच स्वर्गाचं दार म्हणायचं की आणखी काही? हे तुर्तास सांगणं जरा कठीणच आहे.