Sonia Gandhi ED case | सोनिया गांधींची आज ED चौकशी; कॉंग्रेसनेत्यांचं आंदोलन

Sonia Gandhi | सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी होणार आहे.

Updated: Jul 26, 2022, 08:46 AM IST
Sonia Gandhi ED case | सोनिया गांधींची आज ED चौकशी; कॉंग्रेसनेत्यांचं आंदोलन title=

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी होणार आहे. सोनियां गांधींची आज दुस-यांदा ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे काँग्रेस देशभरात शांततेत सत्याग्रह आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या सर्व खासदार, प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीसांना आंदोलनात सहभागी होण्याचे हायकमांडचे आदेश आहेत.

कॉग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी होणार आहे. त्याविरोधात देशभरात काँग्रेस निदर्शनं करणार आहे. मात्र ही निदर्शनं शांततेत सत्याग्रहाच्या पद्धतीने करा असे आदेश हायकमांडने दिले आहेत.