Adhaar Pan Linking: 31 मार्चच्या आधी करा सर्व आर्थिक कामं अन्यथा होईल मोठं नुकसान

Adhaar Pan Link & ITR E Filing: 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष हे सुरू झाले आहे तेव्हा आपल्यालाही अनेक गोष्टींचे अपडेट (Financial Year) येयला सुरूवात झाली असेलच. त्यातील महत्त्वाच्या अपडेट्स असतात त्या म्हणजे पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक, आयटीआर फिलिंग, बॅंकेशी संबंधित (Bank) कामं... त्यामुळे आपल्यालाही अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते तेव्हा जाणून घेऊया की या येत्या 31 मार्चपर्यंत (31 March) तुम्ही कोणत्या गोष्टी प्राधान्यानं करणं आवश्यक आहे. 

Updated: Mar 16, 2023, 04:45 PM IST
Adhaar Pan Linking: 31 मार्चच्या आधी करा सर्व आर्थिक कामं अन्यथा होईल मोठं नुकसान title=
E filing income tax aadhaar pan link do this important work before 31 march 2023 otherwise there may be difficulties related to money

Important Work OF Finance Before 31 March: 1 एप्रिलपासून चालू आर्थिक वर्ष (Finacial Year)  हे सुरू झालं आहे त्यामुळे आपल्यालाही आता आपली काही महत्त्वपुर्ण कामं करून घेणे गरजेचे आहे. आपल्यासाठी मुख्य गोष्ट असते ती म्हणजे पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्डची (Adhar Card). ते लिंक न केल्याशिवाय आपल्यालाही पुढील कामं करता येत नाहीत कारण त्यानुसार आपली अनेक कामं ही बिघडू शकतात. आता 31 मार्चच्याही आधी तुम्हाला तुमची काही काम करणं ही बंधनकारक आहेत. तेव्हा फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्डच नाही तर आयटीआर फिलिंग (ITR Filling), पीपीएफ, एनपीएस, टॅक्स सेव्हिंग इव्हेसमेंटशी (Tax Saving Investment) संबंधित अनेक कामं ही उरकायची आहेत. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही आता कोणत्या गोष्टी सोप्प्या पद्धतीनं करू शकता, 31 मार्च संपायला अवघे काहीच दिवस आहेत. 

आधार आणि पॅन कार्ड लिंकींग - 

आपल्याला आयकर विभागाकडून आलेल्या सुचनेनुसार आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Card) लिंक करणं आवश्यक आहे. पॅन कार्डशी आपलं आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे. तेव्हा जर का तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी 31 एप्रिल पर्यंत लिंक झालेले नसेल तर तुम्हाला ते लिंक करण्यासाठी 1 एप्रिलपासून 1000 रूपये अधिक भरावे लागतील. 

टॅक्स सेव्हिंग इन्व्हेसमेंट 

ज्यांना जास्त कर भरावा लागतो त्यांना टॅक्स सेव्हिंग इन्व्हेसमेंटचा उपयोग करता येतो. समजा या चालू आर्थिक वर्षात जर का तुमचा पगार किवा इन्कम हे टॅक्सेबल झाले असेल तर तुम्हाला टॅक्स सेव्हिंग इन्व्हेसमेंटनुसार तुम्ही ईएलएसएस म्युच्युअल फंड किंवा बॅंक एफडीचा (FD) वापर करून तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकता. 

पीपीएफ, एनपीएस आणि एसएनव्हाय खाते

पीपीएफ, एनपीएस आणि एसएनव्हाय खात्यांमधून आपल्याला नवीन रक्कम जमा करावीच लागते कारण त्यातून तुम्ही तुमचे खाते ब्लॉक होण्याापासून वाचवू शकता. हे आपल्या बॅंक अकांऊटप्रमाणेच (Bank Account) असते. प्रत्येक नोकरदारवर्गाला हे काम करणे आवश्यक असते. 

आयटीआर भरणे

आयटीआर भरणं हे अत्यंत आवश्यक असते नाहीतर आपल्याला त्यानुसार अनेक गोष्टी अधिकीच्या करण्याचा बोजा पडू शकतो. आयटीआर तुम्ही इनकम टॅक्सच्या (Income Tax) वेबसाईटवर जाऊन भरू शकता. तेव्हा हे काम तुम्हाला लवकरात लवकरच भरणे आवश्यक असते नाहीतर तुम्हाला काही गोष्टी जास्त कराव्या लागतील. लवकरच आपली सर्व आर्थिक कामे उरकून घ्या.