Do you know | हे सहा भारतीय ब्रँड जे तुम्हाला वाटतात विदेशी; परंतु आहेत 100 % हिंदुस्तानी

 भारतातील बाजारांमध्ये ग्लोबल ब्रॅंड देखील चांगली छाप उमटवत आहेत. परंतु यामध्ये अशी बरीच नावं आहेत. ते ब्रॅंड देशी आहेत की, विदेशी यात संभ्रम असतो

Updated: Jul 10, 2021, 02:26 PM IST
Do you know | हे सहा भारतीय ब्रँड जे तुम्हाला वाटतात विदेशी; परंतु आहेत 100 % हिंदुस्तानी title=

मुंबई : भारतातील बाजारांमध्ये ग्लोबल ब्रॅंड देखील चांगली छाप उमटवत आहेत. परंतु यामध्ये अशी बरीच नावं आहेत. ते ब्रॅंड देशी आहेत की, विदेशी यात संभ्रम असतो. परंतु बाजारात या ब्रॅंड्सची मागणी जोरात असते. आम्ही तुम्हाला असे 6 ब्रॅंड सांगणार आहोत. जे नावावरून तुम्हाल विदेशी वाटू शकतात परंतु आहेत शुद्ध हिंदुस्तानी...

मोंटे कार्लो


मोंटे कार्लो 100 टक्के शुद्ध हिंदुस्तानी ब्रॅंड आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये नाहर गृप ऑफ कंपनीजवळ या बँडची मालकी आहे. सध्या जवाहरलाल ओस्वाल या कंपनीचे अध्यक्ष आहेत. हा एक फॅशन वेअर आणि टेक्सटाइल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे.

ऐलन सोली

 ऐलन सोली हा मदुरा फॅशन आणि लाइफस्टाइल कंपनीचा शुद्ध भारतीय ब्रँड आहे. ही कंपनी अदित्या बिर्ला गृपची सबसिडरी कंपनी आहे.
 
 पीटर इंग्लंड


 मदुरा फॅशन आणि लाइफस्टाइलचाच एक ब्रॅड पीटर इंग्लंड आहे. या ब्रँडच्या नावाने शर्ट, ट्राउजर, वॉलेट, टाय संपूर्ण फॅशन रेंज येते. महिलांसाठी या ब्रॅडचा कोणताही प्रोडक्ट नाही
 
 लॅक्मी


 लॅक्मी एक शुद्ध हिंदुस्तानी कॉस्मेटिक्स ब्रॅंड आहे. त्याची मालकी, हिंदुस्तान युनिलिवरकडे आहे. भारतात कॉस्मेटिक्स ब्रँडमध्ये लॅक्मी नंबर एक आहे. 
 
 रॉयल एनफिल्ड 


रॉयल एनफिल्डच्या बुलेटची भारतात सर्वात दमदार बाईक म्हणून ओळख आहे. आधी हे विदेशी कंपनीचे प्रोडक्ट होते. कालातंराने भारतीय कंपनीने रॉयल इंग्लंड एनफिल्ड विकत घेतली. रॉयल एनफिल्ड आयशर मोटर्सची उप कंपनी आहे. तिचा उत्पादन चैन्नईमध्ये होते.

लार्सन ऍंड टर्बो


लार्सन आणि टर्बो ही हिंदुस्तानी तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँड कंपनी आहे. ही कंपनी इंजिनिअरींग, कंन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्चरींग आणि फायनांशिअल सर्हिस सेक्टरमध्ये देखील काम करते. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. अनिल मनिभाई नाईक या गृपचे अध्यक्ष आहेत.