पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेड च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 8, 2017, 04:43 PM IST
पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरूवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेड च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी आणली आहे. 

उच्च न्यायालयाने हा निर्णय गुरूवारी घेतला असून डाबर इंडियाने याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पतंजलीच्या जाहिरातीमध्ये डाबर कंपनीची खिल्ली उडवली आहे. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने पंतजलीला च्यवनप्राश संदर्भातील कोणतीही जाहिरात दाखवण्यावर बंदी आणली आहे. 

कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी असणार आहे. त्यासोबतच खंडपीठने पंतजली आयुर्वेद लिमिटेला नोटीस पाठवली असून डाबर इंडियाच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले आहे. डाबर इंडियाने पतंजलीवर मानहानीचा दावा म्हणून २.०१ करोड रुपयांची मागणी केली आहे. 

१ सप्टेंबर रोजी डाबर इंडियाने याचिका दाखल केली होती. एवढंच नाही तर त्यांनी असं म्हटलं होतं की, आता पतंजलीच्या साबणावर देखील बंदी आली आहे. यामुळे पंतजलीला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.