नवी दल्ली : संपूर्ण जगात गेल्या वर्षापासून कोरोना व्हायरसने थैमान घातलं. कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही, तर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत पसली आहे. कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी DCGIने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना मंजुरी दिली आहे. आज पत्रकार परिषद घेवून DCGIने यासंदर्भात माहिती दिली आहे. देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे.
सीरम, ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसींना आपात्कालीन परिस्थितीत वापर करण्याची मंजुरी DCGIने दिली आहे. त्याचप्रमाणे 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये ही लस स्टोर करावी लागणार आहे.
दरम्यान DCGIने या दोन लसींना मान्यता दिल्यामुळे भारतात दोन्ही लसींचा मार्ग मकळा झाला आहे. तर दुसरीकडे देशात लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
719 जिल्ह्यांमधील 57 हजार स्वयेंसेवकांचं प्रशिक्षण पू्र्ण झालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. लसीकरण करणाऱ्या 96 हजार कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. शिवाय रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन सरकारच्या कोविन ऍपवरून सुरू असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.