घरच्यांनी शिक्षणासाठी शहरात पाठवलं नाही, मुलाने पेटता सुतळी बॉम्ब तोंडात ठेवला आणि...

मनासारखं शिक्षण घेता येत नसल्याने एका तरुणाने चक्क फटाक्यांच्या मदतीने आत्महत्या केली. तर दुसऱ्या एका घटनेत प्रियसीने क्राईम पेट्रोल बघून प्रियकर आणि त्याच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला.

Updated: Apr 24, 2023, 06:31 PM IST
घरच्यांनी शिक्षणासाठी शहरात पाठवलं नाही, मुलाने पेटता सुतळी बॉम्ब तोंडात ठेवला आणि... title=

Crime News : कुटुंबियांनी शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवण्यास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन एका मुलाने तोंडात सुतळी बॉम्ब पेटवत आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत मुलाचं नाव  ब्रजेश प्रजापती असून तो गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. ब्रजेशला उच्च शिक्षणासाठी (Higher Education) मोठ्या शहरात जायचं होतं. पण त्याच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती (Financial Problem) बेताची होती. त्याचा सर्व खर्च करणं घरच्यांना शक्य नव्हतं. 

तोंडात फोडला सुतळी बॉम्ब
कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची आवड असतानाही मोठ्या शहरात जाता येत नसल्याने ब्रजेश तणावात होता. घटनेच्या दिवशी सकाळ 9 वाजता ब्रजेश वॉशरुमला गेला. यावेळी त्याने तोंडात सुतळी बॉम्ब ठेवत तो पेटवला. बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने कुटुंबिय दचलके आणि सर्वजण वॉशरुमच्या दिशेने पळाले. तिथलं दृष्य पाहून ब्रजेशच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. ब्रजेश रक्तबंबाळ अवस्थेत वॉशरुमच्या जमिनीवर पडला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. 

कुटुंबाची परिस्थिती बेताची
ब्रजेशचा मोठा भाऊ ह्रदयेशने दिलेल्या माहितीनुसार ब्रजेश अभ्यासत खूप हुशार होता, स्थानिक महाविद्यलायत तो बीएससी शिकत होता. त्याला मोठ्या शहरात शिकायचं होतं, पण इतका पैसा खर्च करणं आई-वडिलांना शक्य नव्हतं. ही बाब ब्रजेशच्या मनाला लागली होती आणि त्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं ब्रजेशच्या भावाने सांगितलं. 

क्राईम पेट्रोल पाहून प्रियसीने घेतला बदला
दरम्यान छत्तीसगढमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्राईम पेट्रोल पाहून एका मुलीने प्रियकर आणि त्याच्या पत्नीवर अॅसिड अटॅक केला. याप्रकरणी पोलिसांनी या मुलीला अटक केली आहे. घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. छत्तीसगढमधल्या भानपुरी भागातील आमाबाल गावातील ही घटना आहे. 

23 वर्षांच्या आरोपी मुलीची काही वर्षांपूर्वी गावातील डमरु बघेल नावाच्या मुलाशी ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. डमरुने त्या मुलीला लग्नाचं आमीष दाखत तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्या मुलीने केलाय. पण याच दरम्यान कुटुंबियांनी डमरुचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवलं. ही गोष्ट कळताच आरोपी मुलीने डमरुला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण डमरुने तिला भेटण्यास टाळाटाळ सुरुवात केली. 

क्रामई पेट्रोल या गुन्हेगारी घटनांवर आधारीत मालिकेच्या एका भागात अॅसिड हल्ला केल्याची दृश्य त्या मुलीने पाहिली होती. हा मार्ग अवलंबत बदला घेण्याचा निश्चय त्या मुलीने केला. यासाठी तीने संपूर्ण योजना तयार केली. त्यानंतर डमरुच्या लग्नाच्या दिवशी ती अॅसीडची बाटली घेऊन हॉलमध्ये पोहोचली. त्याचवेळी हॉलमधील लाईट गेल्याने हॉलमध्ये अंधार पसरला. या संधीचा फायदा घेत आरोपी मुलीने डमरु आणि नववधुवर अॅसीड टाकलं आणि तिथून ती फरार झाली. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला मुलीला अटक केली.