Corona Virus : चीन पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाच्या विळख्यात आला आहे. कोविड-19 निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केवळ चीनच नाही तर युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. एपिडेमियोलॉजिस्टचा अंदाज आहे की, पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के आणि पृथ्वीच्या 10 टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता आहे आणि लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. दुसरीकडे, येत्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाचे (New Year 2023) आगमन होणार आहे. चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहता भारतीयांच्या (corona in india) नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला ग्रहण तर लागणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. चीनमधील परिस्थिती इतकी अनियंत्रित झाली आहे की चिनी कम्युनिस्ट पक्षाने तर म्हटले आहे की, ज्याला संसर्ग व्हायचा आहे, त्याला संसर्ग होऊ द्या, ज्यांना मरायचे आहे त्यांना मरू द्या. आरोग्य तज्ज्ञाने असाही दावा केला आहे की आता चीनमध्ये संक्रमित लोकांची संख्या एका दिवसापेक्षा कमी वेळात दुप्पट होऊ शकते.
वाचा : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध
कोरोना भारतात पसरणार?
सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, भारत पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या विळख्यात येऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर कोविड 19 वर्किंग ग्रुप एनटीजीआयचे अध्यक्ष एनके अरोरा यांनी दिले आहे. वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, 'आम्ही ऐकत आहोत की चीनमध्ये कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. जोपर्यंत भारताचा संबंध आहे, भारतातील मोठ्या संख्येने लोकांना कोविड विरूद्ध लसीकरण करण्यात आले आहे. लस विशेषत: प्रौढ लोकसंख्येसाठी देण्यात आली आहे.
THERMONUCLEAR BAD—Hospitals completely overwhelmed in China ever since restrictions dropped. Epidemiologist estimate 60% of 10% of Earth’s population likely infected over next 90 days. Deaths likely in the millions—plural. This is just the start—pic.twitter.com/VAEvF0ALg9
— Eric Feigl-Ding (DrEricDing) December 19, 2022
एनके अरोरा पुढे म्हणाले की, INSACOG डेटा दर्शवितो की, जगात सर्वत्र आढळणारे ओमिक्रॉनचे जवळजवळ सर्व उप-प्रकार भारतात आढळतात. येथे प्रचलित नसलेल्या अनेक उप-प्रकार नाहीत. ते पुढे म्हणाले की चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याने घाबरण्याची गरज नाही.
चीनमध्ये मृतदेहांचे ढीग पाहून थक्क व्हाल!
चीनमध्ये कोरोना कहर झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी रूग्णालयात खाटांची संख्या कमी असल्यामुळे रूग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचीही कमतरता असताना औषध आणि ऑक्सिजनचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.