...म्हणून प्रोटेम स्पीकर बोपैया यांना घाबरली काँग्रेस, जेडीएस

विधानसभेच्या अध्यक्षांना का घाबरली काँग्रेस आणि जेडीएस...

Updated: May 19, 2018, 02:14 PM IST
...म्हणून प्रोटेम स्पीकर बोपैया यांना घाबरली काँग्रेस, जेडीएस title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये राज्यपालांनी विधानसभेमध्ये शनिवार होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी भाजपचे वरिष्ठ आमदार केजी बोपैया यांना प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त केलं. विराजपेट येथून आमदार असलेले बोपैया याआधी देखील स्पीकर होते. पण काँग्रेस-जेडीएस याविरोधात सुप्रीम कोर्टात पोहोचले पण कोर्टाचा निर्णय देखील त्यांच्या विरोधात लागला.

काँग्रेस का घाबरली?

बहुमत चाचणीनंतर विधानसभेत गोँधळ होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या या संपूर्ण प्रक्रियेत विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. प्रोटेम स्पीकर यांनी जर या दरम्यान काही आमदारांना निलंबित केलं गेलं तर बहुमताचा आकडा कमी होऊ शकतो. 

काँग्रेसला अशी देखील भीती आहे की आवाजी मतदानाद्वारे बहुमत सिद्ध केलं जाऊ शकतं. या विरोधात जरी काँग्रेस-जेडीएस कोर्टात गेली तरी या संपूर्ण प्रक्रियेला आणि निकाल येण्यासाठी वेळ लागू शकतो. तो पर्यंत भाजपला बहुमत जुळवाजुळवी करण्यास वेळ मिळेल. 

काँग्रेसची आमदार आर.वी देशपांडे यांना प्रोटेम स्पीकर बनवण्याची मागणी होती. कर्नाटक विधानसभेत 104 आमदार असणाऱ्या भाजपचा आणखी एक आमदार बोपैया यांना प्रोटेम स्पीकर बनवल्याने कमी झाला आहे. त्यामुळे प्रश्न असा देखील उपस्थित होत आहे की तर मग भाजपने बोपैया यांना प्रोटेम स्पीकर का बनवलं.?