CBI Raid: पंजाबमधील AAP आमदाराच्या ठावठिकाणांवर CBI चे छापे, करोडोंची फसवणूक

CBI Raid in Punjab: पंजाबमध्ये CBI ने आम आदमी पार्टीच्या आमदारावर मोठी कारवाई केली आहे. 40 कोटींच्या बँक फसवणुकीत आमदाराच्या अडचणीत वाढ होत आहे.

Updated: May 7, 2022, 06:17 PM IST
CBI Raid: पंजाबमधील AAP आमदाराच्या ठावठिकाणांवर CBI चे छापे, करोडोंची फसवणूक title=

CBI Raid in Punjab AAP MLA Premises : पंजाबमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. आम आदमी पार्टीचे आमदार जसवंत सिंग गज्जन माजरा यांच्या ठिकाणांवर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने या धाडी टाकल्या आहेत. आप आमदारावर ४० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयने पंजाबमधील जसवंत सिंग गज्जन माजरा यांच्या ऐकूण 3 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, अमरगढच्या आमदाराविरुद्धच्या खटल्याच्या संदर्भात संगरूर जिल्ह्यातील मालेर कोटला भागात शोध घेण्यात आला. गज्जन माजरा यांचे वडिलोपार्जित घर मालेर कोटला येथे आहे.

बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून कारवाई

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर आप आमदार जसवंत सिंग गज्जन माजरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.