भोपाळ : मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला. येथील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे. आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी हालचाल सुरु केली आहे. तसा काँग्रेसने थेट आरोपही केला आहे. त्यामुळे भाजपचे सत्ता स्थापनेचे नवे मिशन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
#BreakingNews । भाजपने आठ आमदारांना गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड हॉटेलात लपवल्याचा काँग्रेसचा आरोप । काँग्रेसचे चार आमदार, बसपाचे दोन आणि एक सपाचा तर एक अपक्ष आमदाराचा समावेश । भाजप मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैशांचं आमिष दाखवत असल्याचा काँग्रेसचा आरोप pic.twitter.com/ORqEU58es2
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 4, 2020
भाजपने आठ आमदारांना गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड हॉटेलात लपवल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. यामध्ये काँग्रेसचे चार आमदार, बसपाचे दोन आणि एक सपाचा तर एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे. भाजप मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैशांचं आमिष दाखवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आमदारांना काँग्रेस नेत्यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप मध्यप्रदेशचे अर्थमंत्री तरुण भनोट यांनी केला आहे. त्यामुळे भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.
आमदरांवर पाळत ठेवण्यासाठी हरियाणाच्या पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान कमलनाथ सरकारचे मंत्री जीतू पटवारी आणि मंत्री जयवर्धन सिंह यांनी रात्री उशीरा हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचा जीव भांड्यात पडला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून काँग्रेस सरकारला कोणताही धोका नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. परंतु याबाबत भाजपकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
0