नवी दिल्ली : कावेरी पाणी वाटप वादात उपोषणाला बसलेल्या AIADMK कार्यकर्त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. एआयएडीएमकेचे कार्यकर्ते स्टेजवर उषोषण करताना तसेच स्टेजच्यामागे बिर्याणी खातानाही दिसत आहे. वायरल होणारे हे फोटोस वेल्लोरचे आहेत. ३ एप्रिलला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत एआयएडीएमकेचे कार्यकर्ता उपोषणाला बसले होते. उपोषणादरम्यान काही कार्यकर्ता बिर्याणी खाताना दिसले.
कावेरी पाणी वाद
Hunger strike with lunch break: AIADMK cadre eat biriyani & tomato rice pic.twitter.com/cs6YPwh4YG
— Chayan Chatterjee (@Satyanewshi) April 4, 2018
हे कार्यकर्ता टॉमेटो भात खात असल्याचीही चर्चा रंगली आहे. या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये उपोषण केलं होत. कावेरी पाण्याच्या वादात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तामिळनाडुमध्ये कावेरी प्रबंधन बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली जात आहे.