वाराणसी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांमुळे १८५७ चा उठाव हा इतिहासाचा भाग बनला असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले. हा पहिला स्वातंत्र्य लढा असे नाव दिले. सावरकरांमुळेच ही क्रांती इतिहासाचा एक भाग बनली असेही त्यांनी स्पष्ट केले. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या (बीएचयू) भारत अध्ययन केंद्राद्वारे भारताचे राजकीय भविष्य या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
आपण केव्हापर्यंत डाव्यांना आणि ब्रिटीश इतिहासकारांना दोष देणार आहोत ? आपण ब्रिटीश, डावे आणि मुघलकालिन इतिहासकारांना दोष देणे बंद करुन आपल्या मेहनतीने दिशा केंद्रीत करायला हवी. देशाचा गौरवशाली इतिहास हा सत्याच्या आधारे लिहिण्याची आता गरज आहे. ज्यांच्यासोबत अन्याय झाला त्यांना न्याय मिळायला हवे असेही अमित शाह म्हणाले.