Amazon Prime Day Sale 2022 : यंदाच्या 23 आणि 24 जुलैला Amazon Prime Day Sale 2022 आयोजित करण्यात आलाय. यूजर्स या सेलबद्दल खूप उत्सुक आहेत. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून इतर घरगुती वस्तूंपर्यंत सर्व प्रकारच्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट दिला जातोय.
Amazon Prime Day Sale 2022 मध्ये सहभाग घेण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही Amazon Prime Member असायला हवे कारण हा सेल फक्त प्राइम सदस्यांसाठी आहे. हे सदस्यत्व खरेदी केल्यानंतरच तुम्ही याऑफरचा लाभ घेऊ शकाल. एका महिन्याच्या महिन्याच्यासाठी तुम्हाला 179 रुपये मोजावे लागतील, तीन महिन्यांसाठी तुम्हाला 459 रुपये द्यावे लागतील आणि वार्षिक मेंबरशीप 1499 रुपयांमध्ये घेता येईल.
जर तुम्हाला ऑफरनंतर पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही Amazon Pay बॅलन्स वापरा, हे तुम्हाला खूप मदत करेल. तुम्ही त्याचं वॉलेट Google Pay आणि PhonePe द्वारे देखील रिचार्ज करू शकता.
Amazon Prime Day Sale 2022 मध्ये कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी, डीलमध्ये दिलेल्या बँक ऑफरकडे निश्चितपणे लक्ष द्या. या सेलमध्ये, Amazon ने SBI सोबत नवीन भागीदारी केल्याने या बँकेच्या कार्डधारकांना 10 टक्के त्वरित सूट मिळेल.
सेल सुरू झाल्यानंतर, कोणत्याही प्रोडक्टची किंमत कमी होण्याची वाट पाहू नका, त्या वेळी उपलब्ध असलेली डील सर्वोत्तम म्हणून खरेदी करा.
Amazon Prime Day Sale 2022 दरम्यान म्हणजे जुलै महिन्याच्या 23 आणि 24 तारखेला संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 दरम्यान तुम्हाला विशेष लाइटनिंग डील ऑफर केल्या जातील. या ऑफरचा फायदा घेण्याची खात्री करुन घ्या कारण तुम्हाला सर्वोत्तम किमतीत प्रोडक्टस मिळतील.