नवी दिल्ली : एअर इंडियाच्या AI-880 या विमानातील प्रवाशांना प्रवासादरम्यान चांगलाच त्रास सहन करावा लागला. दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी पश्चिम बंगालच्या बागडोगरा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी या विमानाने टेक ऑफ केले.
मात्र प्रवासादरम्यान विमानातील एसी बंद पडला. यावेळी प्रवाशांनी गर्मीने इतके हैराण केले की पेपर तसेच मॅगझीनच्या सहाय्याने ते वारा घालत होते.
दरम्यान, विमानात एसी काम करत नसल्याची माहिती पायलट होती हे जेव्हा प्रवाशांना समजले तेव्हा त्यांचा पारा अधिकच चढला. दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी विमान दिल्लीत पोहोचले. मात्र या प्रवासात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला.
#WATCH Air India Delhi-Bagdogra flight took off with faulty AC system, passengers protested complaining of suffocation pic.twitter.com/3nibvSrb1E
— ANI (@ANI_news) July 3, 2017