PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...

उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jul 7, 2024, 03:35 PM IST
PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या... title=
After receiving the first installment of PM Awas Yojana 11 women left their husbands and children absconded with lover

एक विचित्र घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. प्रत्येकाच घराच स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सरकारकडून अनेक योजना आहेत. म्हाडा (Mhada), सिडको (CIDCO) आणि प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) त्यापैकी एक आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्यापहिला हप्ता मिळताच महिलांनी नवरा आणि मुलांना सोडून पळ काढला आहे. एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 महिल्यांनी पहिला हप्ता मिळताच नवराचा हात सोडून प्रियकराचा हात धरलाय. या महिलांच्या पतींनी या घटनेची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केलीय. (After receiving the first installment of PM Awas Yojana 11 women left their husbands and children absconded with lover)

कुठली आहे ही विचित्र घटना?

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मराजगंज जिल्ह्यातील निचलौल ब्लॉकमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व महिला वेगवेगळ्या गावातील आहेत. या महिलांचे नवरे जेव्हा पंतप्रधान आवाज योजनेसंदर्भात पोलिसांकडे पोहोचले आणि त्यांनी दुसरा हप्ता थांबवण्याची विनंती केली तेव्ही ही धक्कादायक घटना समोर आली. या 11 महिला 9 वेगवेगळ्या गावातील होत्या. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता हा 40 हजार रुपये होता. हे 40 हजार रुपये घेऊन या 11 महिला प्रियकरांसोबत फरार झाल्या आहेत. दरम्यान दुसरीकडे पतींच्या तक्रारीनंतर विभागाने दिलेली सरकारी रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.

2350 लाभार्थ्यांची निवड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023-24 मध्ये महाराजगंजच्या निचलौल ब्लॉक क्षेत्रातील एकूण 108 गावांमध्ये 2350 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी 2 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची घरं बांधण्यात आलीय. या योजनेनुसार या 11 महिलांना घराचा पहिला हप्ता सरकारकडून देण्यात आला. पण घराच स्वप्न राहिले दुसरीकडे या महिला प्रियकरांसोबत वेगळा संसार थाटण्यासाठी पैसे घेऊन पसार झाल्या आहेत. दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान आवास योजनेतील पुढचा हप्ता थांबवण्यात आलाय.