नवी दिल्ली : 'पकोड्या'वरुन राजकारण सध्या चांगलच गाजतयं. दरम्यान छत्तीसगडच्या राजनंदगावमधील भाजपाचे खासदार आणि छत्तीसगड सीएम रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक सिंह यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
'बजेट वर चर्चा' दरम्यान गुरूवारी त्यांनी कॉंग्रेसवर आरोप केले. कॉंग्रेसने गरीबांची खिल्ली उडवल्याचे ते म्हणाले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी 'चाय वाला' अशी पंतप्रधानांची खिल्ली उडविल्याने कॉंग्रेस ४४ सीटापर्यंतच पोहोचली. आता 'पकोड्या' वरुन खिल्ली उडविल्याने ५ जागांपूरतीच राहील असे अभिषेक यांनी म्हटले.
२०१९ च्या निवडणुकीत पकोड्याचं राजकारण कॉंग्रेसला भोवणार असल्याचे अभिषेक यावेळी म्हणाले.
अनेक राज्यांमध्ये निवडुकांत जनता आमच्यासोबत असल्याचे ते म्हणाले. आमच्या धोरणांची खिल्ली उडविता इथपर्यंत ठिक होतं पण पकोडा विकण्यावरून खिल्ली उडवू नका.
गरीबांना हा अपमान सहन होणार नाही. आम्ही गरीबांसाठी काम करतो.
गरीब माणूस आपल्या मेहनतीने परिवाराचे पालनपोषण करतो. पण काहीजण त्याची मस्करी करतात. निवडणुकांमध्ये अशांना त्याचे उत्तर मिळणार आहे.
कोणी पकोड्याचं दुकान टाकून दिवसाचे २०० रुपये कमावतात मग तुम्ही त्याला रोजगार म्हणणार की नाही? असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
त्यानंतर संसदेत कोणता ना कोणता खासदार 'पकोड्या'चा उल्लेख करतोय.