Online Shopping : सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड चांगला वाढला आहे. मार्केट किंवा दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा घर बसल्या ऑनलाईन शॉपिंग करणे जास्त फायदेशीर आणि सोईचे ठरत आहे. यामुळे अनेक जण ऑनलाईन शॉपिंग करताना दिसतात. ऑनलाइन वस्तू ऑर्डर केल्यावर दोन ते चार दिवस अथवा आठवड्याभरात याची घरपोच डिलीव्हरी होते. मात्र एका व्यक्तीला ऑनलाइन शॉपिंगचा अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. ऑनलाइन ऑर्डर केलेली वस्तू चार महिन्यानंतर त्याच्या घरी पोहचली आहे. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूची डिलिव्हरी मिळण्यासाठी या व्यक्तीला तब्बल चार वर्ष वाट पहावी लागली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीला Online Shopping चा विचित्र अनुभव आला आहे.
दिल्लीत राहणाऱ्या नितीन अग्रवालसोबत हा प्रकार घडला आहे. नितीन IT क्षेत्रात काम करतात. 2019 मध्ये त्यांनी अली एक्सप्रेस (AliExpress) नावाच्या वेबसाईटवरुन एक इलेक्टॉनिक गॅजेट ऑर्डर केले होते. या वस्तुसाठी त्याने ऑनलाईन पेमेंट देखील केले होते. यानंतर तो वस्तु डिलीव्हर होण्याची वाट पहात होता.
2019 मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले. यानंतर भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 58 चीनी App बॅन केल्या. AliExpress या App देखील यात समावेश होता. अली एक्सप्रेस वेबसाईटच बॅन झाल्याने आपण ऑर्डर केलेली वस्तु काही आता मिळणार नाही. तसेच पैसे देखील बुडाले हा विचार करुन नितीन यांनी वस्तु मिळेल याची आशाच सोडून दिली होती.
Never lose hope! So, I ordered this from Ali Express (now banned in India) back in 2019 and the parcel was delivered today. pic.twitter.com/xRa5JADonK
— Tech Bharat (Nitin Agarwal) (@techbharatco) June 21, 2023
ऑर्डर केलेली वस्तुचे पार्सल मिळेल असे नितीन यांना वाटत नव्हते. अचानक चार वर्षानंतर त्यांना ऑनलाईन ऑर्डर केलेलेल्या वस्तुचे पार्सल मिळाले आहे.ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. कधीही हार मानू नका आणि आशा सोडू नका. मी 2019 मध्ये ऑर्डर केलेले पार्सल मला 2023 मध्ये मिळाले आहे. AliExpress वर भारतात बंदी असताना हे पार्सल मला मिळाले असल्याचे नितीन यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.