मुंबई : एखादा भयावह प्रसंग पाहताना, ऐकताना, किंवा कोणा एकाला सांगताना, अती थंड वातावरणात असताना अचानकच शरीर शहारतं, अर्थात अंगावर काटा उभा राहिला असं आपण म्हणतो. प्रसंग वेगवेगळे असतात, पण त्यावेळी अंगावर काटा आल्यावर लगेचच आपण त्याकडे इतरांचं लक्ष वेधतो. पण हा काटा येतो म्हणजे नेमकं होतं तरी काय? (Why people had Goosebumps know the reason )
Goosebumps म्हणजेच अंगावर काटा उभा राहण्याची ही प्रक्रिया शारीरिक रचनेचाच एक भाग आहे. पण, असं होतं तरी का? जाणून घ्या...
त्वचेवर असणारा प्रत्येक केसामुळं लहानलहान मांसपेशी आकुंचन पावतात, विस्तारात आणि त्यामुळं अंगावर काटा उभा राहतो. आकुंचन पावणाऱ्या प्रत्येक स्नायूच्या पृष्ठावर एक खड्डा तयार होतो. ज्यामुळं त्याच्या आजुबाजूला उंचवटा तयार होतो. .
वाचा : Home Remedies for Periods Cramps: मासिक पाळीतील वेदना कमी करण्याचे रामबाण उपाय
जेव्हा एखाद्या व्यक्तीला (Cold) थंडी वाजते तेव्हा असंच काहीसं जाणवतं. हाच प्रकार प्राण्यांसोबतही घडतो. काटा येताच त्यांच्या शरीरावर असणारे केस पसरतात आणि काही प्रमाणात हवा त्यात साठवतात. ज्यामुळं शरीरावर उष्णतेचा एक थर तयार होतो.
यामागचं शास्त्रीय कारण काय? (Scientific rason behind Goosebumps)
स्ट्रेस हॉर्मोन म्हणजेच ऐड्रेनलिनच्या स्त्रावामुळेही अंगावर काटा उभा राहतो. यामुळं शरीरावर इतरही परिणाम होतात. कारण, सहसा ही प्रक्रिया जास्त थंडी वाजल्यास, भीती वाटल्यास, भावनिक झाल्यास किंवा अती ताण घेतल्या उदभवू शकते.
अंगावर काटा येण्याव्यतिरिक्त काहींना (Sweating) घाम फुटतो, हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो, कित्येकदा रक्तदाबही (Blood Preasure) वाढतो. काही भूतकाळातील प्रसंग आठवूनही अंगावर काटा उभा राहतो. आता याबद्दल इतकी माहिती तर मिळाली, त्यामुळे यापुढे तुम्हाला कोणी म्हटलं की अरे अंग शहारलं... तर यामागचं कारण त्यांना नक्की सांगा.